AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Results 2026 LIVE : चेंबूरमध्ये भाजपची बाजी की शिवसेनेचे कमबॅक, पहा विजयी उमेदवारांची यादी

Brihanmumbai Municipal Corporation BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालांमध्ये चेंबूरच्या M/W विभागातील प्रभाग 149 ते 155 चे सविस्तर विश्लेषण. टिळकनगर, माहुल आणि चेंबूर कॉलनी परिसरात कोणत्या पक्षाने मारली बाजी? जाणून घ्या लोकसंख्या आणि आरक्षणासह संपूर्ण माहिती.

BMC Election Results 2026 LIVE : चेंबूरमध्ये भाजपची बाजी की शिवसेनेचे कमबॅक, पहा विजयी उमेदवारांची यादी
BMC Mumbai
| Updated on: Jan 16, 2026 | 5:09 PM
Share

BMC Election Results 2026 LIVE : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. त्यातच मुंबईतील M/W (एम-पश्चिम) विभागातील प्रभाग क्र 149 ते 155 चे निकाल हाती आले आहेत. चेंबूर आणि परिसराचा समावेश असलेल्या या वॉर्डमध्ये एकूण 7 प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये मध्यमवर्गीय सोसायट्यांपासून ते झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपर्यंतच्या लोकसंख्येचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत या विभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली होती. यंदा आरक्षणातील बदल, वाढलेली लोकसंख्या आणि स्थानिक नागरी प्रश्न यामुळे या प्रभागांमधील लढत अधिक चुरशीची झाली. आता या वॉर्डात मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

प्रभाग क्रमांक 149 ते 155 मधील विजयी उमेदवारांची नावे

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
149
150
151 कशिश राजेश फुलवारिया भाजप
152
153
154
155

प्रभाग 149 : टिळकनगर आणि छेडानगर परिसर या प्रभागाची एकूण लोकसंख्या 49,983 इतकी आहे. यात प्रामुख्याने टिळकनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, छेडानगर आणि पेस्तमसागर कॉलनी यांसारख्या महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने येथे वर्चस्व राखले होते. भाजपच्या सुषम सावंत यांनी शिवसेनेच्या संजय कदम यांचा पराभव करून विजय मिळवला होता.

प्रभाग 150 : राहुल नगर आणि बी.एम.सी. कॉलनी असलेल्या या प्रभागाची एकूण लोकसंख्या 50,391 इतकी आहे. या प्रभागात राहुल नगर, बी.एम.सी. कॉलनी, ज्योतीनगर आणि न्यु गरीब जनता नगर हे भाग येतात. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित करण्यात आला आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या संगीता हांडोरे यांनी शिवसेनेच्या अरुणा काकड यांना पराभव करुन विजय मिळवला होता.

प्रभाग 151 : या प्रभागाची लोकसंख्या 59,169 इतकी आहे. यात सहकारनगर, ठक्करबाप्पा कॉलनी, वत्सलाबाई नाईकनगर आणि साईबाबानगरचा समावेश होतो. यंदा हा प्रभाग अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव ठेवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे राजेश फुलवारीया विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या कमलाकर नाईक यांना कडवी झुंज दिली होती.

प्रभाग 152 : या प्रभागात पोस्टल कॉलनी, चेंबूर गावठाण, जय अंबे नगर आणि महादेववाडी या परिसरांचा समावेश होतो. या प्रभागाची लोकसंख्या 60,363 इतकी असून यंदा हा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या प्रभागातून गेल्या निवडणुकीत भाजपच्या आशा मराठे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या सोनाली साळवे यांचा पराभव केला होता.

प्रभाग 153 : घाटला आणि संतोषनगर परिसर घाटला, संतोषनगर, बसंतनगर आणि संभाजीनगर या प्रमुख भागांचा समावेश असलेल्या या प्रभागाची लोकसंख्या 60,981 आहे. यंदा हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित आहे. 2017 मध्ये शिवसेनेच्या अनिल पाटणकर यांनी काँग्रेसच्या हेमंत पाटील यांना पराभूत करून भगवा फडकवला होता.

प्रभाग 154 : चेंबूर कॉलनी आणि कलेक्टर कॉलनी असलेल्या या प्रभागाची लोकसंख्या 62,653 इतकी आहे. यात चेंबूर कॉलनी, युनियन पार्क, कलेक्टर कॉलनी आणि अशोकनगर या उच्चभ्रू आणि वस्ती भागांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. भाजपच्या महादेव शिवगण यांनी शिवसेनेच्या शेखर चव्हाण यांचा पराभव करत या जागेवर कब्जा मिळवला होता.

प्रभाग 155 : या प्रभागाची लोकसंख्या 61,530 इतकी असून या प्रभागात म्हैसूर कॉलनी, माहुल व्हिलेज, सुमननगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी आणि भक्ती पार्क हे भाग येतात. यंदा हा प्रभाग अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षित करण्यात आला आहे. या प्रभागात शिवसेनेचे श्रीकांत शेट्ये विजयी झाले होते. त्यांनी भाजप-रासप युतीचे आप्पासाहेब अवचरे यांचा पराभव केला होता.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.