AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Elections 2022 | मुंबई महापालिकेवर ‘प्रशासक राज’, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईला असेच सोडणार नाही

मुंबई महापालिकेची मुदत आज संपत आहे. मात्र, अद्याप निवडणुका जाहीर न झाल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. उद्यापासून मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक पाहणार आहेत. जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत प्रशासकच मुंबई महापालिकेचा गाडा हाकणार आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

BMC Elections 2022 | मुंबई महापालिकेवर 'प्रशासक राज', महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईला असेच सोडणार नाही
मुंबई महापालिकेवर उद्यापासून 'प्रशासक राज'Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 1:59 PM
Share

मुंबई: मुंबई महापालिकेची (bmc) मुदत संपत आहे. मात्र, अद्याप निवडणुका जाहीर न झाल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. आजपासून मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक (administrator) पाहणार आहेत. जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत प्रशासकच मुंबई महापालिकेचा गाडा हाकणार आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर या काळजीवाहू महापौर असणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर (mayor kishori pednekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचा कार्यकाळ संपला असल्याने माझी नवी इनिंग सुरू होत असल्याचं म्हटलं आहे. मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार आहे. मी मुंबईला असेच सोडणार नाही. मी काम करणार, असा निर्धारही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. नगरसेवक म्हणून पाच वर्ष पूर्ण झाली आहे. उद्यापासून माझी नवी इनिंग सुरू होत आहे. आता पुन्हा जोमाने काम करू. पक्ष बांधणीसाठी वेळ देणार आहे. मी परिचारिका होते. परिचारिकेची आवड असल्यानेच मी काम करू शकले. मग कोरोना काळात स्थिती हाताळण्याची संधी मिळाली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मोठी संधी दिली. त्यामुळे मी काम करू शकले. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. या काळात फक्त किरीट सोमय्या यांनीच माझ्यावर वैयक्तिक टीका केली. श्रीकृष्णाने द्रोपदीला मदत केली होती. तुम्ही त्रास देत आहात, अशी टीकाही त्यांनी केली.

महापालिकेवर भगवाच फडकेल

कोरोना काळात मुंबईने चांगलं काम केलं. कोरोना रोखण्यात मुंबई यशस्वी ठरली. देशात अव्वल ठरली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आव्हानांना संधी मानून काम केलं, असं सांगतानाच मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. शिवसेनेचाच महापौर बसेल, असंही त्या म्हणाल्या. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोना काळात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मुंबईकरांचे आभारही मानले.

राणे खोटं बोलत आहेत

दिशा सालियन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन केला होता, असा आरोप केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री फोन करणार नाहीत. राणे खोटं बोलत आहेत. फोन केला असेल तर पुरावा दाखवा, असं आव्हानच त्यांनी राणेंना दिलं. तसेच पोलिसांना बाजूला करा म्हणता, मग तुम्हीही ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा बाजूला करा, मग बघा काय होतं ते. उगाच राजकारणाचा स्तर घसरत आहे, असं त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

VIDEO: तर विधानसभेत फाशी घेईल, रवी राणाच्या संतापानं सभागृह स्तब्ध, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांविरोधात पुरावे; पेन ड्राईव्ह दाखवला

महाविकास आघाडीची ही दंडेलशाही, पण आम्हाला पर्वा नाही, मुंबै बँकप्रकरणी प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांची प्रतिक्रिया!

स्वतःला रिचार्ज कसे करावे, माणूस जुन्याचा नवा कसा होतो; भुजबळांनी सांगितला चिरतारुण्याचा फंडा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.