AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid Center : मोठी बातमी! कोरोना रुग्णांची संख्या घटली, मुंबई महापालिका जम्बो कोविड सेंटर बंद करणार

Covid Center : या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सदर तिनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण 11 हजार 165 रुग्णशय्यांची उपलब्धता आहे.

Covid Center : मोठी बातमी! कोरोना रुग्णांची संख्या घटली, मुंबई महापालिका जम्बो कोविड सेंटर बंद करणार
मुंबई महापालिका जम्बो कोविड सेंटर बंद करणारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2022 | 7:05 PM
Share

मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोना (corona) रुग्णांची संख्या घटल्याने महापालिकेने जम्बो कोविड सेंटर (Covid Center) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कोविड’ साथरोगाच्या काळात मुंबईतील ‘कोविड’ बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी महानगरपालिकेची 8 विविध ठिकाणी ‘कोविड जम्बो केंद्रे’ कार्यरत होती. या 8 ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये 12 हजार 375 रुग्‍णशय्या व 907 अतिदक्षता रुग्‍णशय्या होत्या. या उपचार केंद्रांच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) क्षेत्रात नागरिकांचे प्रभावीपणे लसीकरण करण्यात आले. परिणामी, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘कोविड’ बाधित रुग्णांसह लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कोविड रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

जम्बो कोविड सेंटर बंद करण्याच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात 3 ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ बंद केली. तर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 5 केंद्रे बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, ‘कोविड’ बाधा झाल्यास संबंधित रुग्णांना वेळच्यावेळी योग्य उपचार मिळावेत, या हेतूने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

ही कोविड सेंटर बंद होणार

‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को – गोरेगांव आणि कांजूरमार्ग येथील ‘जम्बो कोविड केअर सेंटर’ यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर आता दुसऱ्या टप्प्यात वांद्रे – कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, या ठिकाणी कार्यरत असणारी लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत. ज्यामुळे, लसीकरणाबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असं संजीव कुमार यांनी सांगितलं.

चार प्रमुख रुग्णालये, 16 उपनगरीय रुग्णालयात उपचार

‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या घटल्यामुळे 8 ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्यात येत आहेत. तथापि, नव्याने आढळून येणाऱ्या ‘कोविड’ बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची 4 प्रमुख रुग्णालये, 16 उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सदर तिनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण 11 हजार 165 रुग्णशय्यांची उपलब्धता आहे. आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल. तसेच सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.