AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?

Chandivali Assembly Constituency: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाचा EVM मशीनची तपासणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं पोट निवडणुकीच्या धामधुमीत हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण आणि कोर्टाचा आदेश?

High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?
मुंबई हायकोर्ट, चांदिवली विधानसभा निवडणूक, ईव्हीएम तपासणी Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 10, 2026 | 10:33 AM
Share

Bombay High Court orders to check EVM: राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर इकडे देशातील निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निकाल देण्यात आला.

चांदिवली विधानसभेत शिंदेसेनेचा विजय

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे हे 2024 मधील विधानसभा निवडणुकीत मुंबई उपनगरमधील चांदिवली मतदारसंघात शड्डू ठोकून होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे दिग्गज उमेदवार नसीम खान होते. नसीम खान यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. पण या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला. या निकालाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी याप्रकरणी गडबड झाल्याची बाजू मांडली.

न्यायालयाने त्यांचे मुद्दे लक्षात घेत, गुरुवारी ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. ईव्हीएम उत्पादक बंगळुरू येथील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून येत्या 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविषयीचे पत्र मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नसीम खान यांना पाठवले आहे. त्यात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी हा निकाल दिला आहे.

हा ऐतिहासिक निकाल

2009 आणि 2014 च्या निवडणुकीत नसीम खान हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. पण त्यानंतर सलग दोनदा, 2019 आणि 2024 या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. पण यावेळी नसीम खान यांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. न्यायालयाचा निकाल हा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली आहे. राहुल गांधी हे सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित करत असताना आणि पत्रकार परिषदेतून हल्लाबोल करत असताना या निकालामुळे विरोधकांना मोठा दिलासा दिल्याचे मानले जात आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक