AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेस्टसोबत धावणाऱ्या एसटी बसेसची सेवा उद्यापासून बंद, अनिल परब यांची माहिती

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. तसेच मुंबईत बेस्ट सोबतच एसटी महामंडळाच्याही काही गाड्या धावत होत्या. आता या गाड्यांची सेवा 14 जूनपासून थांबवण्यात येत आहे. तसे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

बेस्टसोबत धावणाऱ्या एसटी बसेसची सेवा उद्यापासून बंद, अनिल परब यांची माहिती
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 12:42 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून एसटी महामंडळाने तसेच कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. तसेच मुंबईत बेस्ट सोबतच एसटी महामंडळाच्याही काही गाड्या धावत होत्या. आता या गाड्यांची सेवा 14 जूनपासून थांबवण्यात येत आहे. तसे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. (buses of state transport who were in Mumbai amid Corona pandemic will be stop from 14 June information given by Anil Parab)

एसटी महामंडळाच्या गाड्या थांबवण्यात येणार

महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली आहे. याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी बेस्टच्या साथीला एसटी बसेस मुंबईत धावत होत्या. यासाठी महाराष्ट्राच्या महामंडळाचे कानाकोपऱ्यातील कर्मचारी सेवा देत होते. ही सेवा उद्यापासून थांबवण्यात येत आहे, असे अनि परब यांनी सांगितले. तसेच परगावांहून येऊन मुंबईसाठी सेवा देणाऱ्या सर्व चालक, वाहक व व्यवस्थेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले. तुमच्या अशा सेवेमुळेच एस. टी. चा सन्मान व विश्वास आजही टिकून आहे, असे अनिल परब म्हणाले.

अजूनही सामान्यांना लोकलने प्रवास करण्यावर बंदी

दरम्यान, सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही मुंबई तसेच उपनगरांत प्रवास करण्यासाठी लोकल सुरु करण्यात आलेल्या नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच सरकारी कर्मचारी वगळता कोणालाही लोकमधून प्रवास करण्यास मुभा नाही. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाच्या अतिरिक्त गाड्यादेखील 14 जूनपासून बंद होत आहेत.

इतर बातम्या :

PUNE UNLOCK | चिअर्स! मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार, रेस्टॉरंट, बारसाठी 11 वाजेपर्यंत परवानगी

पुणे महापालिकेसाठी मनसेचा स्वबळाचा नारा, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 53 फूट उंचीचं चित्र

सोलापूर शहर अनलॉक होणार, ग्रामीण लॉकच राहणार, वाचा सविस्तर काय सुरु, काय बंद राहणार?

(buses of state transport who were in Mumbai amid Corona pandemic will be stop from 14 June information given by Anil Parab)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.