AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली, कार डिझायनर दिलीप छाबरियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर दिलीप छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत. (Dilip Chhabria Param Bir Singh)

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली, कार डिझायनर दिलीप छाबरियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दिलीप छाब्रिया, परमबीर सिंग, सचिन वाझे
| Updated on: May 31, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया (Dilip Chhabria) यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा दावाही छाबरिया यांनी केला आहे. चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत. (Car Designer Dilip Chhabria writes to CM Uddhav Thackeray claims Param Bir Singh Sachin Vaze framed him)

दिलीप छाबरिया यांचा आरोप काय?

“माझ्या डीसीपीडीएल कंपनीत 52 टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी, सीआययू युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरुन माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केला आहे. 25 कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा 15 हून अधिक गुन्ह्यांना सामोरे जा, असं धमकावल्याचा दावाही छाबरियांनी केला आहे.

परमबीरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असून सीआययू युनिटच्या अंतर्गत तपास येत असलेल्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी छाबरिया यांनी केली आहे. मुकेश अंबानी अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोघांचं पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आलं आहे.

कोण आहेत दिलीप छाबरिया?

दिलीप छाब्रिया हे देशातील सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. सेलिब्रिटी आणि धनाढ्यांच्या कार डिझाईन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅनही दिलीप छाब्रियांनीच डिझाईन केली होती. क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने दिलीप छाब्रियांविरोधात 2015 मध्ये तक्रार नोंदवली होती. दिलीप छाब्रियांनी पाच लाख रुपये घेऊनही आपले काम योग्य पद्धतीने न केल्याचा आरोप दिनेश कार्तिकने केला होता.

डिझायनर कार खरेदी-विक्री आणि फायनान्स करुन अनेकांची कोट्यवधींना फसवणूक करण्याच्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज वर्तवला जात होता. या गुन्ह्यात दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. दिलीप छाब्रिया डिझाईन्स प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत.

कपिल शर्माची तक्रार काय?

कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) तक्रारीनंतर कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. देशातील सर्वात चांगली व्हॅनिटी व्हॅन बनवून देण्याच्या आमिषाने छाब्रियांनी जवळपास साडेपाच कोटी रुपये उकळल्याचा आरोप कपिल शर्माने केला होता. कपिल शर्माच्या तक्रारीनंतर मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

डिझायनर कारप्रेमींना धक्का, मुंबई पोलिसांकडून मोठं रॅकेट उद्ध्वस्त, दिलीप छाब्रियांना बेड्या

कपिल शर्मा मुंबई क्राइम ब्रँचच्या ऑफिसमध्ये, दिलीप छाब्रियांविरोधात जबाब देणार!

(Car Designer Dilip Chhabria writes to CM Uddhav Thackeray claims Param Bir Singh Sachin Vaze framed him)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.