मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप, इव्हेंट मॅनेजरसह 2 कास्टिंग डायरेक्टरला अटक

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोपाली इव्हेंट मॅनेजरसह 2 कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. | police arrested casting directors including event manager

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप, इव्हेंट मॅनेजरसह 2 कास्टिंग डायरेक्टरला अटक
Mumbai Police

मुंबई : मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून 2 कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. 14 वर्षांच्या मुलीला मॉडेलिंगचे अमिश दाखवून वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप या दोन कास्टिंग डायरेक्टरांवर आहे. (casting directors including event manager arrested for luring 14-year-old girl into prostitution)

धक्कादायक म्हणजे 14 वर्षांच्या मुलीला मॉडेलिंगचे अमिश दाखवून वेश्या व्यवसायात आणल्याचे उघड झाल्याने मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई केली आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम मिळवून दिल्यानंतर आरोपींनी तिला वेश्या व्यवसायत आणल्याचा धक्कादायक प्रकार प्राथमिक तपासात समोर आला आहे. अंधेरी पूर्वेतल्या मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये समाजसेवा शाखेने छापा टाकून ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी कास्टिंग डायरेक्टर आशिष पटेल, मोहम्मद शेख, विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया यांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा पथकाने अटक केलीय. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

(casting directors including event manager arrested for luring 14-year-old girl into prostitution)

हे ही वाचा :

Viva Group : विवा ग्रुपच्या कारभाराचं रहस्य भंगारातील लॅपटॉपमध्ये, ED कडून भंगारवाल्याचा शोध

छेडछाडीतून तरुणाचा खून, पाच वर्षांनंतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

Published On - 1:40 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI