रेल्वे तिकिटांचा काळा बाजार जोमात, 7 लाख रुपयांची 475 ई-तिकिटे जप्त, 19 दलालांना बेड्या

जानेवारी 2021 ते 10 सप्टेंबर 2021 पर्यंत सखोल तपासणी आणि विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये एटीएस टीमने 19 दलालांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून  7.22 लाख रुपयांची 475  ई-तिकिटे जप्त केली करण्यात आले आहेत.

रेल्वे तिकिटांचा काळा बाजार जोमात, 7 लाख रुपयांची 475 ई-तिकिटे जप्त, 19 दलालांना बेड्या
railway ticket

मुंबई : सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने तिकिटांच्या काळ्या बाजारावर मोठी कारवाई केली आहे. बोनाफाईड प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या सततच्या प्रयत्नांमध्ये, अँटी टाउट स्क्वॉड (एटीएस), वाणिज्यिक शाखा मुंबई विभागाने आरपीएफच्या मदतीने अनधिकृत तिकीट विक्रेत्यांविरोधात सखोल तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत जानेवारी 2021 ते 10 सप्टेंबर 2021 पर्यंत सखोल तपासणी आणि विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये एटीएस टीमने 19 दलालांना अटक करण्यात आलंय. तसेच त्यांच्याकडून  7.22 लाख रुपयांची 475  ई-तिकिटे जप्त करण्यात आले आहेत. (Central Railway Mumbai Division arrested 19 accused for black marketing of railway e ticket)

10 सप्टेंबर रोजी दोघांना अटक

अलीकडेच 10 सप्टेंबर 2021 रोजी एटीएस टीम, मुंबई विभागाने आरपीएफसह संयुक्तपणे तपासणी केली. या तपासणीत मुंबईच्या पायधुणी परिसरातील नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे छापा टाकला. या कारवाईत बेकायदेशीर ई-तिकिटिंग खरेदी व्यवसायात सहभागी असलेल्या 2 जणांना अटक केली. दोघांनीही आरोप कबूल केले आहेत. दोन्ही व्यक्तींना 2 डेस्कटॉप, मोबाईल तसेच 122 ई-तिकिटांसह पकडण्यात आले. या कारवाईनंतर आरपीएफ तसेच एटीएसने आरोपींना आरपीएफ पोस्ट कुर्ला येथे आणले. त्यानंतर या आरोपींविरोधात कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

एप्रिल महिन्यात 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त 

25 एप्रिल रोजीदेखील वडाळा (पूर्व), मुंबई येथे असेच ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी दादरयेथील RPF च्या मदतीने 57700  36 ई-तिकिटे जप्त करण्यात आली. तसेच मुख्य दक्षता निरीक्षक आणि आरपीएफ कुर्ला यांच्या दुसर्‍या संयुक्त कारवाईमध्ये, भाईंदर येथे 1,11,175 रुपयांची 151 ई-तिकिटे जप्त करण्यात आली होती.

योग्य आणि वैध तिकिटांना घेऊनच प्रवास करा 

दरम्यान, तिकीट विक्रीचा हा काळाबाजार समोर आल्यानंतर मध्य रेल्वेने प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले. तसेच अधिकृत एजंट किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्राकडून तिकिटे खरेदी करावेत असेही रेल्वे विभागाने सांगितले.

इतर बातम्या :

MPSC 2020 Exam Date | विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! एमपीएससीची मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला

खोटे आरोप, मंत्र्यांना टार्गेट करणं चुकीचं; जाणीवपूर्वक बदनामी सुरु असल्याचा जयंत पाटलांचा आरोप

Co-Operative society Election | झेडपी पाठोपाठ राज्यात सहकारी सोसायट्यांच्याही निवडणुकीचे ढोल, 20 सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश

(Central Railway Mumbai Division arrested 19 accused for black marketing of railway e ticket)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI