AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, प्रवासी खोळंबले

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-मुंबई मार्गावर सकाळी बिघाड झाल्याने लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कामावर पोहोचायला उशीर झाला.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, प्रवासी खोळंबले
| Updated on: Oct 14, 2025 | 9:23 AM
Share

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी बदलापूरहून मुंबईकडे येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. यामुळे लोकल गाड्या तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले.

तांत्रिक बिघाडामुळे लोकल विस्कळीत

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक कोलमडली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणारी लोकल वाहतुकीचे तीन तेरा वाजले. सकाळी ७ ते ९ या गर्दीच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. यामुळे बदलापूरहून मुंबई, ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी थांबल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही गाड्या या अतिशय धीम्या गतीने धावत असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवाशांना मोठा मनस्ताप

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे यांसह विविध रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी झुंबड उडाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने विविध स्थानकात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या वेळेनुसार स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना लोकल वेळेवर मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याची चिंता आणि लोकलच्या वारंवार होणाऱ्या विलंबाचा संताप प्रवाशांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

संपूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडले

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर अवलंबून असलेल्या नोकरदारांना या विस्कळीत सेवेचा मोठा फटका बसला. ३० मिनिटांहून अधिक विलंबाने लोकल सुरू झाल्याने अनेकांना ऑफिसला पोहोचायला उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. ही समस्या दररोजची असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावरून टीका केली आहे. दररोज हाच खोळंबा, रेल्वे कधी सुधारणार? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जात आहे. लोकल उशिरा सुरु असल्याने अनेक प्रवाशांचे वेळापत्रकच नाही, तर संपूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडले आहे.

दुरुस्तीचे काम सुरू

दरम्यान हा बिघाड लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र पुढील काही तास मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील लोकल सेवा उशिरानेच धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...