Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर, सेंट्रल मार्गावरील सेवा सुरु राहणार

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर, सेंट्रल मार्गावरील सेवा सुरु राहणार
Mega Block
Image Credit source: TV9

मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

आनंद पांडे

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 20, 2022 | 6:15 AM

मुंबई : मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मेन लाईवर मेगाब्लॉक नसेल. सी. एस. एम. टी. – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर स. 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत व चुनाभट्टी/वांद्रे – सी.एस. एम. टी. अप हार्बर मार्गावर स. 11.10 ते सायं. 4.10 पर्यंत मेगाब्लॉक सुरु राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं (Central Railway) ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नेमका कसा असेल ब्लॉक

मध्य रेल्वे आज हार्बर लाईनच्या उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक सुरु राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. त्यामुळं, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनवरील सेवा सुरु राहणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विभागातील मेन लाईनवर कोणताही मेगाब्लॉक चालवला जाणार नाही. वेस्टर्न लाईन वर देखील ब्लॉक नसेल. या मार्गावरील सेवा सुरु राहणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

मध्य रेल्वेचं ट्विट

इतर बातम्या:

चांगलं काम होत असताना काळे झेंडे दाखवतात, त्यांच्या बुद्धीची कीव येते, Kapil Patil यांचं शिवसेनेवर टीकास्त्र

गिरीश महाजन यांच्या कन्येच्या लग्नासाठी मंडप सजला, श्रेयाच्या हळदीचे फोटो चर्चेत


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें