AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SARTHI Meeting: सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा

राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरु केलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नावर राजकारण चांगलंच तापलं आहे (Sarthi meeting with Sambhajiraje Ajit Pawar).

SARTHI Meeting: सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा
| Edited By: | Updated on: Jul 09, 2020 | 1:43 PM
Share

मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरु केलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत बसण्यावरुन झालेला वाद मिटला आहे (Sarthi meeting with Sambhajiraje Ajit Pawar). मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर अजित पवारांनी या सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसंच “सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं” असं अजित पवार म्हणाले.

सारथीसंदर्भात बैठक झाली. याबाबतचे सर्व सचिव बैठकीला हजर होते. सारथी संस्था बंद केली जाणार नाही. ही अफवा पसरवली जात आहे. सारथीला 8 कोटी उद्याच दिले जातील, असं अजित पवार म्हणाले.

सारथीचं काम नियोजन विभागाच्या अखत्यारित घेतलं जाणार. मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन खात्याच्या अख्यारित घेणार, असं अजित पवारांनी सांगितलं.

सारथीवर उत्तर शोधायचं की फाटे फोडायचे? मला सारथीवर मार्ग काढायचा आहे, यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार, दर दोन महिन्यांनी याचा पाठपुरावा घेणार, असं अजित पवार म्हणाले. मराठा-ओबीसी असा वाद भासवण्याचा प्रयत्न केला, मात्र असा कोणताही विषय नाही, संभाजीराजेंच्या ट्विटनंतर मी स्वतः विजय वडेट्टीवारांशी बोललो, असंही अजित पवारांनी सांगितलं.

संभाजीराजे काय म्हणाले?

मराठा समाजानं गैरअर्थ घेऊ नये. काही निर्णय घ्यायचे होते म्हणून अजित दादांनी दालनात बैठक घेतली. या संस्थेची स्वाययत्ता कायम राहिली पाहिजे. सारथी टिकवायची आहे, स्वायत्तता टिकवायची आहे, पवार साहेबांनी निर्णय घेतलेत, कुणी गोंधळ आणि गैरसमज करुन घेऊ नये, पूर्वीच्या सचिवांनी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढली, पवारांनी शब्द दिलाय, सारथीची स्वायत्तता टिकेल, त्याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतलीय

सारथी ही शाहू महाराजांच्या नावाने सुरु असलेली संस्था, ती बंद होणार नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम आणि सारथीचं काम आता एकाच छताखाली सुरु होईल

सारथी टिकवण्यासाठी इथं आलोय, सारथीची जबाबदारी अजित पवारांनी घेतली, पवारांनी शब्द दिला, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

सारथी ही संस्था भविष्यात स्वत:च्या पायावर उभी राहिल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करु, सरकारकडून मदतीऐवजी आर्थिक रसद स्वत: उभा करण्याकडे कल असेल, अशी योजना संभाजीराजेंनी सांगितली.

बैठकीत गदारोळ

अजित पवार यांनी सारथीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजेंना स्वतः फोन करुन बोलावलं होतं. मात्र, बैठकीत संभाजीराजे यांना खाली बसवल्याचा मुद्दा उपस्थित करत संभाजीराजेंच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मराठा समन्वयकांसोबत सुरु झालेली बैठक लगेचच आटोपली. विशेष म्हणजे यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलण्यास सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी आपण दालनात बोलू असं म्हणत बैठक सोडली. यानंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी जाणून बुजून छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केल्याचा आरोप केला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

यावेळी संभाजीराजे म्हणाले, “मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

संभाजीराजे यांनी आवाहन करुनही त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत संभाजीराजेंना वरती येण्याचा आग्रह केला. परंतु संभाजी राजे तिसऱ्या ओळीत बसले. त्यांनी कार्यकर्त्यांना न गोंधळ घालण्याचं आवाहन केलं. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

Maratha Reservation | व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल शक्य नाही, मराठा आरक्षणावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे मत

मी ओबीसी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात, मराठा मोर्चाच्या राजीनाम्याच्या मागणीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

संबंधित व्हिडीओ :

Sarthi meeting with Sambhajiraje Ajit Pawar

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.