AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी काही गोष्टी मिळतात, कधी नाही, मात्र आपण…; नाराजीच्या चर्चांवर भुजबळांचं तीन ओळींचं उत्तर

Chhagan Bhujbal on displeasure : छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर छगन भुजबळ यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. समता परिषदेच्या बैठकीवर छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं आहे? छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर...

कधी काही गोष्टी मिळतात, कधी नाही, मात्र आपण...; नाराजीच्या चर्चांवर भुजबळांचं तीन ओळींचं उत्तर
छगन भुजबळ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 17, 2024 | 7:54 PM
Share

मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्द छगन भुजबळ यांनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज आहे असं कधी म्हणालो आहे का? पक्षात राहून कधी- कधी काही गोष्टी मिळतात. काही मिळत नाहीत. आपण काम करत राहायचं असतं, असं छगन भुजबळ म्हणालेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

बैठकीवर काय म्हणाले?

समता परिषदेची बैठक नव्हती. आमचे सात ते दहा आठ चाहत्यांनी बैठक घेतली. वेगवेगळ्या बैठकी झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीत का कस पडलं यांचा आढावा घेतला. समता परिषदेच्या अनेक लोकांना बोलवणार आहेत. दिल्लीत नरेंद्र मोदी साहेब आलेले आहेत. त्यांच्यापुढे मागणी केली पाहिजे. जातनिहाय्य जनगणना करण्याची मागणी केली पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणालेत.’

ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले?

ओबीसीच्या बाबतीत प्रकाश पडेल त्यांची परिस्थितीत काय ते.. एससी आणि एनटीला मिळतील तर ओबीसींना भारत सरकारकडून फंड मिळतील. राज्यापुरती केली तर तसे ओबीसीला येत नाही. मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी उपोषण थांबायला हवं. आम्ही यांच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. ओबीसींवर अन्याय होत असतील सुधारणा करणार आहोत. आत्मसमर्पणानं काम करायला हवं. थोडं आपण थांबायला पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

जणगणना भारत सरकारने मंजूर केली तर सगळं होईल. 54 टक्के ओबीसी आहेत असं म्हणतात. आमचे बरोबर असेल तर ठिक… भारत सरकारकडे मागणी करता येईल. पॉझिटिव्ह परिणाम होईल. आज अतुल सावे , भुमरे , कराड लक्ष्मण हाके शिष्टमंडाळाला भेटले. आम्हीही त्यांच्याशी बोलतो आहोत. एकदम टोकाचा निर्णय घेवू नका असं सांगितलं आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलंय.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली