AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! कॅबिनेटच्या बैठकीत 7 मोठे निर्णय, पोलिसांसाठी मोठी घोषणा काय?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शौर्य गाजवणाऱ्या पोलिसांना 'मुख्यमंत्री शौर्य पदक' जाहीर झाले. तसेच, वडार समाजाला गौण खनिज रॉयल्टीत वाढ करून दिलासा दिला. उच्च शिक्षण संशोधन, पोलीस कोठडीतील मृत्यू नुकसानभरपाई धोरण आणि विविध शैक्षणिक योजनांमधील भत्त्यांमध्ये वाढ करण्यासही मंजुरी मिळाली, ज्यामुळे अनेक समाजघटकांना फायदा होईल.

मोठी बातमी ! कॅबिनेटच्या बैठकीत 7 मोठे निर्णय, पोलिसांसाठी मोठी घोषणा काय?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 2:58 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शौर्य गाजवणाऱ्या पोलिसांना “मुख्यमंत्री शौर्य पदक” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वडार समाजाची पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातील गौण खनिजमधील रॉयल्टी वाढवण्यात आली आहे. ही रॉयल्टी 200 ब्रासवरून 500 ब्रास करण्यात आली आहे. त्यामुळे वडार समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कॅबिनेटमधील 7 निर्णय जसेच्या तसे…

>> पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी “मुख्यमंत्री शौर्य पदक” मिळणार. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी रोख ५० हजार रुपयांचा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. निवडीसाठी त्रिस्तरीय विविध समित्यांच्या रचना करण्यात आली आहे. वर्षभरातील कामगिरीची दखल घेतली घेऊन पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षी १ जानेवारी २०२६ पासूनची कामगिरी गृहीत धरली जाणार आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिन १ मेच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शौर्य पदक प्रदान करण्यात येणार आहे.

>> वडार समाजाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातील गौण खनिज स्वामित्वधनासाठी (रॉयल्टी) वाढीव सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वार्षिक उत्खनन मर्यादा दोनशे ब्रास वरून, पाचशे ब्रास करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन आणि ती काढणे), नियम १९६८ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

>> शैक्षणिक संस्थांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनासाठी सी.एम. सृष्टी (CM SRISTHI (Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions) योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय उच्च व तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतने, रसायन तंत्रज्ञान संस्था -आयसीटी, मुंबई, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे- रायगड या संस्थांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे.

>> पोलीस कोठडीतील मृत्युप्रकरणी नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असताना होणाऱ्या अनैसर्गिक मृत्युच्या बाबतीत मृताच्या कायदेशीर वारसांना वेळेत आर्थिक सहाय्य देण्यासाठी, सर्वसमावेशक असे धोरण तयार करण्यात येणार आहे.

>> सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदारांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २ हजार ३८८ अनुदानीत वसतीगृहांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

>> भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र पण अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

>> अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Follow Us
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम