AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीची पुढची भयंकर स्टेप्स काय? देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याने मोठी खळबळ

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, काँग्रेससह इंडिया आघाडी अराजकता निर्माण करत असून, भारताचे संविधान व लोकशाही नाकारण्याचा प्रयत्न करत आहे. संवैधानिक संस्थांवर अविश्वास निर्माण करून कट्टर डाव्यांचे सरकार आणण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. फडणवीस यांनी याला इंडिया आघाडीची 'भयंकर स्टेप' म्हटले आहे.

इंडिया आघाडीची पुढची भयंकर स्टेप्स काय? देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याने मोठी खळबळ
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 2:30 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनावर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसवाले देशात अराजकता निर्माण करण्याचं काम करत आहेत. काँग्रेसला संविधान नाकारायचं आहे. लोकशाही नाकारायची आहे. त्यांना संवैधानिक संस्था नाकारायच्या आहेत. त्याऐवजी कट्टर डाव्यांचं सरकार आणायचं आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता आंदोलन करून नंतर संविधान नाकारणं ही इंडिया आघाडीची दुसरी स्टेप्स आहे, असा खळबळजनक दावाही फडणवीस यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.

दिल्लीच्या आंदोलनातून काँग्रेस आणि त्यांचे सहकारी अराजकता दाखवून देत आहेत. भारताच्या संवैधानिक संस्थांना बदनाम करणं, या संस्थांवरचा विश्वास उडेल अशा पद्धतीने रोज खोटं बोलणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. आपल्या संस्था कोलमडल्या आहेत. या संस्था न्याय देत नाही असं वारंवार ठसवलं जात आहे. नंतर संविधानाच नाकारणं याप्रकारचं हे षडयंत्र आहे. त्यांचं आंदोलन त्याचाच भाग आहे. काँग्रेसवाले हातात संविधान घेऊन असंवैधानिक काम करत आहेत. कट्टर डाव्यांचं सरकार आलं पाहिजे, हा त्यांचा हेतू आहे. त्यांना भारताचं संविधान नाकारायचं आहे. संविधानाच्या प्रती नकारात्मकता तयार करायची आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

षडयंत्र सुरू आहे

भारताच्या संविधानाने तयार केलेल्या सर्व संस्था कूचकामी आहेत. त्या काम करू शकत नाहीत. त्या न्याय देऊ शकत नाही, अशा भावना त्यांना रुजवायच्या आहेत. त्यानंतर हे संविधान तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, असं सांगण्याची त्यांची दुसरी स्टेप असणार आहे. लोकशाही नाकारण्याची रचना सुरू झाली आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळेच सर्व संस्था नाकारण्याचं काम सुरू आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

काँग्रेसच्या कार्यालयातून आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी हुसकावल्याचा आरोप होत आहेत. हा आरोप त्यांनी खोडून काढला. हा धादांत खोटा आरोप आहे. मुंबईचे पोलीस प्रोफेशनल आहेत. कुणावरही चुकीची कारवाई करत नाही. काल आदिवासी शिष्टमंडळाच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. नाशिकमध्ये जल्लोष करण्यात आला. विद्यार्थ्यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली. एनएसयूआयचे पदाधिकारी आंदोलन संपू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. पण खऱ्या विद्यार्थ्यांना मागण्या मान्य झाल्याचं माहीत आहे, असं ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण राज्य सरकारने त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. सरकार सकारात्मक आहे. केवळ आपल्या नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जात आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

चर्चा सुरूच राहील

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या जागेबाबत आमचं एकमत झालं नाही. त्यामुळे दोघांनी फॉर्म भरायचे आणि चर्चा सुरू ठेवायची हे ठरलं आहे. त्यावर आम्ही पुन्हा चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी