साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही

साकीनाका येथील बलात्काराची घटना अत्यंत दुर्देवी असून या घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. (cm uddhav thackeray discuss with National Commission for Scheduled Castes)

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 4:58 PM

मुंबई: साकीनाका येथील बलात्काराची घटना अत्यंत दुर्देवी असून या घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. तसेच पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. शासन त्यांच्या संगोपनाची पुरेपूर काळजी घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अनुसूचित जाती आयोगाच्या शिष्टमंडळाला दिली. (cm uddhav thackeray discuss with National Commission for Scheduled Castes)

साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार झाल्यानंतर तिचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग मुंबईत आला होता. या आयोगाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावून घेतले आणि त्यांच्याशी चर्चा केली. सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदन, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मिलिंद भारंबे आदिंची उपस्थिती होती.

पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. या परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले.

निराधारांसाठी घरकूल योजना

ज्या निराश्रित व अनाथ महिला रस्त्यांवर राहतात त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून घरकूल योजना सुरू करता येते का? या संदर्भात विचार करता येवू शकतो. यासंदर्भात आयोगाने अशा स्वरुपाची योजना आखण्याविषयी केंद्र शासनास सूचना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी हलदार यांना केली.

पोलिसांनी पीडितेला टेम्पोत टाकून रुग्णालयात नेले

ही घटना कळता क्षणी दहा मिनिटात पोलीस घटना स्थळी पोहचले, एवढेच नाही तर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेस स्वत: टेम्पो चालवत पोलीसांनी तिला रुग्णालयात पोहचवले, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयोगाला दिली.

राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती

काल मुख्यमंत्र्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून विशेष सरकारी अभियोक्ता यांची खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रसिध्द वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली, यावर आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी समाधान व्यक्त केले. (cm uddhav thackeray discuss with National Commission for Scheduled Castes)

संबंधित बातम्या:

साकीनाका बलात्कार प्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, 20 लाखाची मदत, वकील राजा ठाकरे यांची नेमणूक, मुंबई पोलीस आयुक्तांकडून 3 महत्त्वाच्या अपडेट

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

(cm uddhav thackeray discuss with National Commission for Scheduled Castes)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.