CM Udhhav Thackeray | डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस यांच्या रुपाने देव आपल्याला मदत करत आहे : मुख्यमंत्री

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

CM Udhhav Thackeray | डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस यांच्या रुपाने देव आपल्याला मदत करत आहे : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा आणखी (CM Uddhav Thackeray Live)  घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. तसेच, राज्यात सध्या 3 मेपर्यंतचा लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकं काय बोलणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष (CM Uddhav Thackeray Live) लागून आहे.

LIVE UPDATES :

[svt-event date=”26/04/2020,2:02PM” class=”svt-cd-green” ] औषधाच्या आधी भारतीय नागरिक हिम्मत, आत्मविश्वास आणि मनोबलाच्या ताकदीवर कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकू, याचा मला विश्वास : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:58PM” class=”svt-cd-green” ] मजुरांची दोन वेळच्या जेवणाची सोय, दररोज एक लाखापेक्षा जास्त शिवभोजन थाळी : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:56PM” class=”svt-cd-green” ] फोटो पाहून घाबरू नका, केवळ आपली तयारी किती आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न, गोरेगावमधील एग्झिबिशन मैदान, वरळीमध्ये या सुविधा : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:56PM” class=”svt-cd-green” ] १ लाख ८ हजार ९७२ कोरोना चाचण्या, त्यापैकी ७ हजार ६२८ जणांना कोरोनाची लागण, दुर्दैवाने ३२३ जणांचा मृत्यू : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:55PM” class=”svt-cd-green” ] नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार किंवा कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु, डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:55PM” class=”svt-cd-green” ] लक्षणं दिसली तर फिव्हर क्लिनिकमध्ये जा, घरच्या घरी उपचार करू नका, अंगावर काढलं तर विषाणू रौद्र रूप धारण करेल, कोरोनावर औषध नसलं, तरी काळजी घेतल्यास बरा होतो : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:49PM” class=”svt-cd-green” ] 3 मेच्या पुढे काय करायचं? मुंबईत शिथिलता आणताच रहदारी-वर्दळ वाढली, वाढीचा वेग कमी झाला तरी गाफील राहू नका, ही संयमाची परीक्षा, सुदैवाने 80 टक्के रुग्णांना लक्षणं नाहीत : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:48PM” class=”svt-cd-green” ] केंद्राचं पथक मुंबई आणि पुण्यात, त्रयस्थपणे सूचना करण्याचं आवाहन, दोन दिवसापासून केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्यवाटप : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:48PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु, पण इतक्यात ट्रेन सुटणार नाही, गर्दी करायची नाही, संयमाने करण्याची गरज, अन्यथा तपस्चर्या वाया जाईल : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:47PM” class=”svt-cd-green” ] नितीन गडकरी यांचे धन्यवाद, जसे सर्व जात-पात, धर्म बाजूला ठेऊन एकत्र आहेत, तसं राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, सहकार्य करावे, हे आवाहन केल्याबद्दल आभार : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:41PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे काय झालं? कोरोनाचा गुणाकार रोखण्यात आपल्याला यश आलं, ती वाढ आपण नक्कीच काही प्रमाणात आटोक्यात आणली : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:41PM” class=”svt-cd-green” ] दोन पोलीस कोन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला, कोरोनाशी लढताना ते शहीद झाले : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ] देव मंदिरात नाही, आपल्यासोबत आहे, डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस यांच्या रूपाने देव मदत करत आहे : मुख्यमंत्री

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,1:39PM” class=”svt-cd-green” ] हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती अशा सर्वधर्मीय बांधवांनी आपापले सण-उत्सव पुढे ढकलले, राष्ट्रसेवेला प्राधान्य दिलं, मानवताधर्म निवडला, यासाठी सर्वांचे आभार, नमाज रस्त्यावर पढण्याची ही वेळ नाही : मुख्यमंत्री

[/svt-event]

राज्यातील स्थिती काय?

राज्यात काल (25 एप्रिल) तब्बल 811 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे काल दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 323 वर पोहोचली आहे. राज्यात काल 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 1 हजार 76 रुग्णांनी कोरोनावर मात  केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’

कोरोनाच्या पार्श्वभूीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील परिस्थितीची माहिती. तसेच, “भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री आहे. देशात महायज्ञ सुरु असल्याची स्थिती दिसत आहे. प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे”, असं म्हणत त्यांनी देशातील नागरिकांचं कौतुक केलं.

CM UddhavThackeray Live

संबंधित बातम्या :

मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान, कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व प्रत्येकाकडे : पंतप्रधान मोदी

Corona : जालना जिल्हा कोरोनामुक्त, कोरोनाबाधित दोन्ही महिलांचे अहवाल निगेटिव्ह

Corona : नागपुरात कोरोनाचा विळखा घट्ट, 17 नवे रुग्ण, आकडा 124 वर

Published On - 1:40 pm, Sun, 26 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI