CM Uddhav Thackeray: उत्तर प्रदेशात योगी भोंगे उतरु शकतात तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे का नाही? मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच उत्तर

CM Uddhav Thackeray: उत्तर प्रदेशात योगींनी भोंगे हटवले ते हिंदुत्वाचं काम नव्हतंच. ते सर्वधर्म समभावाचं काम होतं, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

CM Uddhav Thackeray: उत्तर प्रदेशात योगी भोंगे उतरु शकतात तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे का नाही? मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच उत्तर
उत्तर प्रदेशात योगी भोंगे उतरु शकतात तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे का नाही? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 2:20 PM

मुंबई: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी मशिदी आणि मंदिरांवरील भोंगे उतरवले आहेत. योगींनी भोंग्यांवर कारवाई करताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर उत्तर प्रदेशात योगी जे करू शकतात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  का करू शकत नाही? असे सवाल केले गेले. मनसे आणि भाजपनेही हे प्रश्न उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी योगी सरकारचं उदाहरण देणाऱ्यांना आणि योगी सरकारला आरसा दाखवला आहे. उद्धव ठाकरे यांनी भोंग्याच्या विषयावर उत्तर देताना थेट कोरोना काळातील उत्तर प्रदेशातील परिस्थितीवर भाष्य करून कोणी कोणत्या गोष्टीत लोकप्रियता घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं सांगत टीकाकारांना तडाखेबंद प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ऑनलाईन मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच विरोधकांवर हल्ला चढवला. तसेच योगी सरकारच्या भोंग्यांवरील कारवाईवरूनही विरोधकांच्या डोळ्यात अंजन घातलं. कोरोना काळात यूपीत गंगेत प्रेते फेकली होती. शेवटचे विधी झाले नाही. 70हून अधिक मुलं ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून दगावली. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन मिळण्याची मारामार होती. यूपीत कोरोना काळात किती जणांनी प्राण गमावले त्याचा आकडा अजून आला नाही. कोरोना काळता उत्तर प्रदेश सरकारने दुर्लक्ष केलं. काम केलं नाही. ते काम करून ते लोकप्रिय झाले नाही. हे करून लोकप्रिय होत असतील तर त्यांची लोकप्रियता त्यांनाच लखलाभ असो. मला माझ्या जनतेच्या जीवाची पर्वा आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

योगींचं काम ‘अजाण’तेपणी

उत्तर प्रदेशात योगींनी भोंगे हटवले ते हिंदुत्वाचं काम नव्हतंच. ते सर्वधर्म समभावाचं काम होतं, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरवले असले तरी परवानगी मागितली तर ते पुन्हा भोंगे लावायला परवानगी देणार आहेत. त्यामुळे यूपीत सर्वांनाच भोंग्याची परवानगी मिळणार आहे. त्यांना डेसिबलचा नियम पाळावा लागणार आहे. भजन, कीर्तन आणि मशिदीवरील भोंगेही त्यात आले. म्हणजे योगींनी हिंदुत्वाचं काम नाही केलं तर सर्व धर्म समभावाचं काम केलं आहे, असा चिमटा काढतानाच योगींना अजाणतेपणी हे काम केल्याचा दावाही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.