Iqbal Singh Chahal: मुख्यमंत्र्यांची ‘ती’ गोष्ट माझ्या आत्म्याला लागली अन्… महापालिका आयुक्त चहल असं का म्हणाले?

संदेश शिर्के

| Edited By: |

Updated on: May 16, 2022 | 3:17 PM

Iqbal Singh Chahal: इक्बालसिंह चहल यांना कोव्हीड काळात महापालिकेत झालेल्या रेमेडिसीव्हिर खरेदी भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारला असता त्यावर स्पष्टीकरण देताना ते भावुक झाले.

Iqbal Singh Chahal: मुख्यमंत्र्यांची 'ती' गोष्ट माझ्या आत्म्याला लागली अन्... महापालिका आयुक्त चहल असं का म्हणाले?
मुख्यमंत्र्यांची 'ती' गोष्ट माझ्या आत्म्याला लागली अन्... महापालिका आयुक्त चहल असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi

Follow us on

मुंबई: आपण कुठेही काम करतो तेव्हा आपला लीडर असतो. संकटात जबाबदारी घ्यायच्या वेळी राजकारणी जबाबदारी झटकताना दिसतात. पण कोरोना संकटात आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी यश आलं तर तुमचं आणि अपयश आलं तर ते माझं राहिल असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचे हे बोल माझ्या आत्म्याला लागेल. त्यामुळे मी चांगलं काम करण्याची शपथ घेतली, असं मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मिनाझ मर्चंट लिखित ‘इक्बाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी इक्बालसिंह चहल यांनी हा किस्सा सांगितला. यावेळी इक्बालसिंह चहल भावूक झाले. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चहल यांच्या कामाचं आणि महापालिकेच्या (bmc) कामाचं कौतुक केलं. महापालिकेने कोव्हिड काळात कठोर मेहनत घेतली. त्यामुळेच आपण धारावी पॅटर्न जगासमोर मांडू शकलो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

इक्बालसिंह चहल यांना कोव्हीड काळात महापालिकेत झालेल्या रेमेडिसीव्हिर खरेदी भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारला असता त्यावर स्पष्टीकरण देताना ते भावुक झाले. आपण जेव्हा युद्धात काम करतो तेव्हा नफा तोटा आणि स्वस्त महाग असं पाहत नाही. एक गोष्ट सांगतो की, केंद्राकडून रेमडिसीव्हिर काढले आणि आमचं पालिकेचे टेंडर काढले तर चार पटीने वाढले आहे. आम्ही चारपट भावाने हे इंजेक्शन खरेदी करत असल्याचा आमच्यावर आरोप होईल हे तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं. पण रेमडेसीव्हिरचा तुटवडा आहे. दोन तासात ऑर्डर नाही दिली तर ही ऑर्डर दुसऱ्यांना दिली जाणार असा मला समोरून निरोप आला. त्यामुळे महागड्या दरात रेमेडिसीव्हिर खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं चहल यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल

स्पॅनिश फ्ल्यू जेव्हा आला होता. तेव्हा काय काय उपाय केले हे आम्ही शोधलं. पण काही सापडलं नाही. पण आम्ही काम करत गेलो आणि जे काम केलं त्याचे डॉक्युमेंट होणे आवश्यक आहे. जर आणखी 35-50 वर्षांनी पुन्हा असाच एखादा पेंडामिक आला तर काय केल पाहिजे हे कळलं पाहिजे यासाठी हे पुस्तकं मार्गदर्शन करेल. या काळात आपण काय मॉडेल तयार केलं. ते सर्व यात नमूद आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यात काल्पनिक काही नाही

आयसोलेशन असताना काहींनी आत्महत्या केली तेव्हा त्याला कसे नियंत्रणात ठेवले. आपण युनिवर्सल टेस्टिंगवर भर दिला. माझे कुटुंब, माझी जबाबदारी सारखे उपक्रम राबवले. नंतर आपण मेंटॉरशिप तयार केली. रस्त्यावर लोक टँकर अडवत होते. मग ऑक्सिजन कसा वाचला पाहिजे असे अनेक मॉडेल तयार केले. फक्त शनिवारी संध्याकाळी मर्चंट माझ्याकडे यायचे आणि संध्याकाळी 6 ते 9 मी बोलायचो आणि 42 तासाचे हे रेकॉर्डिंग केलं आहे. वादळ आलं त्यालाही कसं तोंड दिलं याची देखील यात माहिती आहे. या सगळ्या रेकॉर्डिंगला पुस्तकाचे स्वरूप दिले आहे. आणि जे घडले त्याचा तंतोतंत उल्लेख केलेला आहे. यात काल्पनिक काहीही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI