AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | अखेर मुंबई लॉक डाऊन, लोकल आजपासून 31 मार्चपर्यंत पूर्ण बंद; देशातील रेल्वे वाहतूकही थांबली

22 मार्च रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

Corona | अखेर मुंबई लॉक डाऊन, लोकल आजपासून 31 मार्चपर्यंत पूर्ण बंद; देशातील रेल्वे वाहतूकही थांबली
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Mar 22, 2020 | 2:05 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (All Trains And Local Canceled) टाळण्यासाठी 22 मार्च रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत लोकल तसेच, भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता भारतीय रेल्वेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Corona Virus | राज्यात कोरोनाचा वाढता कहर, 24 तासात मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण

येत्या 31 मार्चपर्यंत फक्त मालवाहतूक करणाऱ्या (All Trains And Local Canceled) गाड्या सुरु राहातील, इथर सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लांब पल्ल्याच्या पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस गाड्या या 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त मालगाड्या सुरु राहणार आहे. तसेच, आज रात्री 12 पासून मुंबई लोकलही बंद ठेवल्या जाणार आहे. त्यामुळे अखेर मुंबईची (All Trains And Local Canceled) लाईफलाईनही ठप्प पडणार आहे.

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूंचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून सर्व लोकल ट्रेन, प्रिमिअम ट्रेन्स, मेल, एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर ट्रेन, कोकण रेल्वे, कोलकाता मेट्रो ट्रेन आज मध्यरात्री पासून बंद ठेवल्या जाणार आहेत.

दरम्यान, ज्या ट्रेन किंवा एक्सप्रेस या संध्याकाळी 4 पूर्वी निघाल्या असतील त्या ट्रेन सुरु राहणार आहेत. तर देशात इतर ठिकाणी गरजेच्या वस्तू ने-आण करण्यासाठी मालगाड्या मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच, ज्या प्रवाशांनी तिकिटांचे बुकिंग केले असेल त्यांना पूर्ण पैसे रिफंड करण्यात येतील.

संबंधित बातम्या :

Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू

मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन : संजय राऊत

Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश