बापरे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यात कोरोना विषाणू; पालिका म्हणते, मुंबईकरांना धोका नाही!

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाले असले तरी मुंबईतून कोरोना संसर्ग पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

बापरे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यात कोरोना विषाणू; पालिका म्हणते, मुंबईकरांना धोका नाही!
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 11:12 AM

मुंबई: मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाले असले तरी मुंबईतून कोरोना संसर्ग पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. आता तर मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यातही कोरोनाचे विषाणू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु, त्यामुळे मुंबईकरांना कोणताही धोका नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं आहे. मात्र, आयसीएमआरच्या अहवालातून झालेल्या या धक्कादायक खुलाश्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

मुंबईमध्ये एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमधील मलनिस्सारणाच्या पाण्यात कोरोनाचा विषाणू आढळून आल्याचे समोर आले आहे. आयसीएमआरने मुंबईमधून सहा ठिकाणी नमुने गोळा केले होते. त्या सर्वच ठिकाणी कोरोना विषाणू असल्याचे सामोर आले आहे. मात्र पालिकेकडून मलनिस्सारण वाहिनीच्या पाण्यावर प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाते. यामुळे मुंबईकरांना धोका नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आयसीएमआरचा सर्व्हे काय सांगतो?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने मुंबईत वडाळा, धारावी, कुर्ला, गोवंडीच्या शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी सर्व्हे करून त्याठिकाणच्या मलनिसारण वाहिनींच्या पाण्यांचे नमुने गोळा केले होते. त्यात १६ मार्चच्या आधी घेतलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आला नव्हता. मात्र ११ ते २२ मे दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

का करण्यात आला सर्व्हे?

कोरोना हा विषाणू नवीन असल्याने त्यावर सर्वप्रकारे अभ्यास केला जात आहे. सुरुवातीला ज्या नागरिकांना याची लागण झाली, त्यांच्या मलातून हा व्हायरस मलनिस्सारण वाहिनीत गेला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाबाधिताच्या मलातून हा विषाणू मलनिस्सारण वाहिन्यात गेला असावा त्यामुळे मलनि:स्सारण वाहिन्यांत उतरणाऱ्या, मलनिस्सारणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याची लागण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली गेली होती. त्यानुसार आयसीएमआरने याबाबत अभ्यास सुरु केला होता. त्या अभ्यासातून मलनिस्सारण वाहिन्यांमध्येही कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो हे समोर आले आहे. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

मुंबईकरांना धोका नाही

मुंबईत सहा ठिकाणी घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळल्याचे म्हटले आहे. त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, असा अहवाल आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही, असा अहवाल आला असल्यास हा अहवाल जुना असेल. मुंबई महापालिका मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करते. प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा मुंबईकर नागरिकांशी थेट संपर्क येत नाही. यामुळे मुंबईकरांना याचा धोका नाही. मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात सुमारे एक टक्के कर्मचारीच पॉझिटिव्ह आढळतात. यामुळे भीतीचे काहीही कारण नाही, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

संबंधित बातम्या:

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार, 1000 रुग्ण आढळल्याने खळबळ

कोरोनातून बरे झाल्यानंतरही नव्याच आजाराचं संकट; जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार?

कोरोना लसनिर्मिती ते लसीकरण, जाणून घ्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

(Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.