AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंना मोठा झटका, मनसेची मान्यता रद्द करा; याचिका दाखल

सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणाबद्दल याचिका दाखल केली आहे, ज्यात मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी आहे. कोर्टाने 'अमराठी' शब्द वगळण्यास सांगत याचिकाकर्त्याला फटकारले.

राज ठाकरेंना मोठा झटका, मनसेची मान्यता रद्द करा; याचिका दाखल
raj thackeray
| Updated on: Nov 18, 2025 | 9:18 AM
Share

उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. अमराठी भाषिकांविरुद्ध चिथावणीखोर भाषणे आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याबद्दल सुनील शुक्लांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच मनसेची राजकीय मान्यता रद्द करावी, अशीही मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांना धारेवर धरले. कोर्टाने याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक हे शब्द याचिकेतून वगळण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्यांना अनेक प्रश्न विचारले. मुळात उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक असा वाद उपस्थित करण्याची गरज काय? असा सवाल कोर्टाने केला.

4 आठवड्यांच्या आत भूमिका स्पष्ट करा

यावेळी न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, हा वाद केवळ द्वेषपूर्ण भाषण या शब्दातून सांगता येऊ शकतो आणि हा शब्द याचिकाकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी हे दोन शब्द वगळण्याची तयारी दर्शवली. याचिकेतून आक्षेपार्ह शब्द वगळण्याची तयारी दर्शविल्यानंतर हायकोर्टाने या याचिकेची नोंद घेतली आहे. कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत 4 आठवड्यांच्या आत यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुनील शुक्ला यांच्या याचिकेत काय?

सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सातत्याने अमराठी भाषिकांना टार्गेट करत आहेत. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील उत्तर भारतीय-हिंदी भाषिक लोकांविरुद्ध धमक्या आणि हिंसेच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच मनसेची मान्यता रद्द करावी, असे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कोर्टाच्या नोटीसमुळे आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाहा व्हिडीओ – 

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक