बिल पाहून कोरोनाग्रस्त रुग्णाचा हॉस्पिटलमधूनच पळ

विरारच्या विजय वल्लभ या रुग्णालयात कोव्हिडचे उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक लाख 30 हजार रुपयांचं बिल आलं होतं

बिल पाहून कोरोनाग्रस्त रुग्णाचा हॉस्पिटलमधूनच पळ
अनिश बेंद्रे

|

Jul 26, 2020 | 7:55 PM

विरार : हॉस्पिटलचं बिल पाहून कोरोनाग्रस्त रुग्ण चक्क रुग्णालयातूनच पळून गेल्याची घटना समोर आली आहे. सव्वा लाखांपेक्षा जास्त बिल पाहून विरारमधील रुग्णाने पळ काढल्याचे बोलले जाते. (COVID Patient runs away from Virar Hospital after seeing bill)

रुग्णालयातील बिलामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. लाखाच्या वर कोव्हिड उपचाराची बिले येत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे.

विरारच्या विजय वल्लभ या रुग्णालयात कोव्हिडचे उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक लाख 30 हजार रुपयांचं बिल आलं होतं. रुग्णाने त्यातील 50 हजार रुपये डिपॉझिटही केले होते. रुग्ण बरा झालेला पाहून डिस्चार्ज देण्याच्या आधीच रुग्णाने रुग्णालयातूनच पलायन केलं आहे.

हेही वाचा : आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवा, दोघा मुलांकडून आरोग्यसेविकेला मारहाण

ही घटना सात दिवसा पूर्वीची आहे. याबाबत हॉस्पिटलने तक्रार दिली नसल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांनी दिली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला फोनही केला, मात्र त्या रुग्णाने हॉस्पिटलमधील स्टाफलाच उलट उत्तर दिल्याचा आरोप केला जात आहे. हॉस्पिटलमधील स्टाफ आणि त्या रुग्णाची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच वायरल झाली आहे. याबाबत माहिती सांगण्यास रुग्णालयातून कुणीही समोर येत नाही. (COVID Patient runs away from Virar Hospital after seeing bill)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें