AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर 80 हजार फेक अकाऊंट्स

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते (Facebook fake accounts)

मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर 80 हजार फेक अकाऊंट्स
| Edited By: | Updated on: Oct 06, 2020 | 1:52 PM
Share

मुंबई : मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते (Facebook fake accounts), असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावर सायबर सेलने आयटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे (Facebook fake accounts).

“मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सुरु असलेल्या अभियानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता सायबर सेल या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु करत आहे”, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 14 जून रोजी मृत्यू झाला. राहत्या घरात सुशांतचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाली आहे, अशा चर्चा होऊ लागल्या आणि बरेच दिवस सोशल मीडियावर सुशांतबद्दल हॅशटॅगही टॉप ट्रेण्डमध्ये होता. यावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशी केली असता हे सर्व फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून सुरु असल्याचे समोर आले आहे.

परदेशातून चालवले जात आहेत फेक अकाऊंट्स

“सर्वाधिक फेक अकाऊंट्सचा प्रॉक्सी सर्व्हर हा परदेशातील आहे. सायरबर सेलच्या अहवालात समजले की, मुंबई पोलिसांच्या विरोधात केलेल्या पोस्ट इटली, जपान, पोलँड, स्लोवेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलँड, रोमानियासारख्या इतर देशातून केल्या आहेत”, अस पोलीस आयुक्तांनी सांगितले.

“फेक अकाऊंट्सची संख्या हजारोमध्ये असू शकते. आम्ही सध्या हे संबंधित आकडे एकत्र करत आहे. या फेक अकाऊंट्सच्या माध्यामातून गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला याबद्दलची सूचना मिळाली होती. त्यानंतर सायबर सेलला याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते”, असंही आयुक्तांनी सांगितले.

सायबर सेलला चौकशी दरम्यान आढळून आले की, हजारोंच्या संख्येत फेक अकाऊंट्स तयार करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस आयुक्तांवर आक्षेपार्ह कॉमेंट्स केल्या आणि त्यांना ट्रोल केले गेले. यासाठी इन्स्टाग्रामपासून इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. प्रत्येक आक्षेपार्ह पोस्ट आणि कॉमेंट्समध्ये मुंबई पोलीस आणि सुशांत सिंह राजपूतच्या हॅशटॅगचा वापर केला गेला, अशी माहितीही सायबर सेलच्या चौकशीतून समोर आली आहे.

“सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येत फेक अकाऊंट्स आहेत. जे मुंबई पोलीस आयुक्तांना ट्रोल करतात. या प्रकरणात आयटी अॅक्ट सेक्शन 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी 2 सप्टेंबरला एका संशयितावर गुन्हा दाखल केला होता. त्याने ट्विटरवर पोलीस आयुक्तांचा मॉर्फ फोटो तयार केला होता”, असं डीसीपी रश्मी यांनी सांगितले.

सुशांतच्या मृत्यूनंतर तयार करण्यात आलेल्या अकाऊंट्सवर विशेष नजर

“सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवा आणि मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट असणाऱ्या अकाऊंट्सची डीटेल्स सायबर सेलकडे सोपवा. विशेष करुन अशा अकाऊंट्सवर नजर ठेवा जे तीन महिन्यापूर्वी सुशांतच्या मृत्यूनंतर सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनीही संदिग्ध अकाऊंट्स ब्लॉक केले आहेत”, असं सायबर पोलिसांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

या हॅशटॅगचा वापर जास्त

“पोलिसांनी चौकशी दरम्यान पाहिले की, पोलिसांना बदनाम करण्यासाठी ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि फेसबूकसह इतर सौशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #JusticeForSSR and #SushantConspiracyExposed #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR चा वापर केलेला आहे”, असंही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी ज्या फेक अकाऊंट्सच्या विरोधात आयटी अॅक्टद्वारे गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 5 वर्षापर्यंत जेल आणि पाच ते 10 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे.

संबंधित बातम्या :

Mumbai | मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र – मुंबई पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद

Sharad Pawar | शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात महत्त्वाची चर्चा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.