कुठे एक रुपया तर कुठे लाखो रुपयांच्या बक्षिसांची दहीहंडी फुटली, काहींनी आसूड ओढले तर काहींनी काढल्या उठाबश्या

राज्यभरात काल दहीहंडी अत्यंत उत्साहात साजरी झाली. अबालवृद्धांनी या उत्सवात भाग घेतला. यावेळी राज्यातील अनेक दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमांना सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे गोविंदांचा उत्साह दुणावला होता.

कुठे एक रुपया तर कुठे लाखो रुपयांच्या बक्षिसांची दहीहंडी फुटली, काहींनी आसूड ओढले तर काहींनी काढल्या उठाबश्या
dahi handiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 2:04 PM

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : राज्यात काल दहीहंडीचा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. डीजेच्या तालावर ठेका धरत तरुणाई दहीहंडीचे थर लावत होती. कधी दहीहंडीपर्यंत पोहोचत होते तर कधी मध्येच थर कोसळत होते. कुणी सहावा थर गाठला तर कुणी आठवा. तर कुणी चौथ्या थरापर्यंतही पोहोचला नाही. खुणावणारं बक्षीस आणि जिद्द यामुळे गोविंदा अधिकच उत्साहात आणि जल्लोषात दहीहंडी फोडत होते. केवळ मुंबई आणि ठाण्यात नाही तर संपूर्ण राज्यात हेच चित्र दिसत होतं. लोकही गोविंदांचा उत्साह वाढवताना दिसत होते. तर अनेक ठिकाणी सेलिब्रिटींनी हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं.

वरळीच्या जांबोरी मैदानात परिवर्तन दहीहंडी उत्सव दणक्यात पार पडला. 7 थर लावून गोविंदा पथकांनी ही दहीहंडी फोडली. चिंतामणी गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडली. याबाबत 3 लाख 33 हजार बक्षीस ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आयोजन भारतीय जनता पार्टीचे नेते संतोष पांडे यांनी केलं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अशिष शेलार उपस्थित होते. विसुअल्स ( जम्बोरी मैदान परिवर्तन दहिहंडी )

थर लावून उठाबश्या

वसईतही दहीहंडीचा उत्साह पाहण्यासारखा होता. कमान गावातील रेयांश प्रतिष्ठाणने दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. आचोळा गावात हा उत्सव पार पडला. यावेळी जय बजरंग दहीहंडी पथकाने सहा थराची सलामी देऊन आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. या गोविंदा पथकाने हंडीला सलामी देताना सहाव्या थरावर एकावर एक तीन एक्यानी 20 उठबश्या काढत रेकॉर्ड तयार केला आहे. मानवी मनोऱ्यातून सहा थराच्या सलामीत 20 उठाबश्या काढणारे आचोळा गावातील गोविंदा पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दहीहंडी मानाची, बक्षीस रुपया

मालेगाव येथील स्टेट बँक जवळ देवाची मानाची दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडली. सालाबादप्रमाणे या दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम अवघा एक रुपया होता. मात्र, उत्सव जसजसा रंगात येतो तेव्हा या दहीहंडीची रक्कम वाढवली जाते. लोकसहभागातून आणि स्वच्छेने लोक देणगी देतात. त्यामुळे रक्कम वाढते.

एक रुपया पासून सुरुवात झालेली बक्षिसाची रक्कम ही यंदा 16 हजार रुपयांपर्यंत पोहचली. मालेगावच्या शिवशंभू प्रतिष्ठानच्या गोविंदा पथकाने पाच थर लावत दहीहंडीचा फोडण्याचा मान मिळवत बक्षीस जिंकले. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे हे देखील उपस्थित होते.

आसूड ओढत दहीहंडी साजरी

पुण्यातल्या भोरमधील भोलावडे गावात, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार, ढोल ताशांच्या तालावर पारंपारिक नृत्य करत एकेमेकांना देवाच्या आसुडाचे फटके मारत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी भोलावडे गावची ही आगळीवेगळी दहीहंडीची प्रथा पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मोठा उत्साह नागरिकांच्यात पाहायला मिळाला. भोरमधील भोलावडे गावात जवळपास 100 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही प्रथा चालत आलीय.

सेलिब्रिटी दहीहंडी

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत चक्क सेलिब्रिटींनी थर लावत हंडी फोडली. संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी नेहमीच सेलिब्रिटी हंडी म्हणून ओळखली जाते. त्यामूळे गोकुळाष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडून या ठिकाणी सेलिब्रिटींनी आपला आनंद व्यक्त केलाय. अभिनेते सुशांत शेलार हेही यावेळी उपस्थित होते.

सर्वात उंच दहीहंड्या

आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती प्रतिष्ठाणची दहीहंडी ही उंच दहीहंडीपैकी एक होती. ठाण्याच्या वर्तक नगरमध्ये पालिका शाळेच्या मैदानावर ही दहीहंडी पार पडली.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांची नौपाड्यातील भगवती मैदानावरील दहीहंडीही चांगलीच चर्चेत होती.

तर ठाण्याच्या टेंबीपाडा येथे दिघे साहेबांची हंडी मानाची हंडी पारप डली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

घाटकोपरमधील आमदार राम कदम यांची दहीहंडी सर्वात उंच दहीहंडी होती.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.