AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षाचं नाव आणि चिन्हही गेलं, आघातांवर आघात सोसणारे उद्धव ठाकरे यांची मोठी रणनीती, ‘मातोश्री’वर मोठ्या घडामोडी

भाजपला (BJP) सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपला एकटं पाडायचं असेल तर देशभरातील विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे.

पक्षाचं नाव आणि चिन्हही गेलं, आघातांवर आघात सोसणारे उद्धव ठाकरे यांची मोठी रणनीती, 'मातोश्री'वर मोठ्या घडामोडी
| Edited By: | Updated on: Feb 24, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला गेल्याने ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील अनेक अडचणी यामुळे वाढल्या आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या हातातून निसटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात लढत आहेत. याशिवाय ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्यासाठी इतर विरोधी पक्षांची मदत घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीच आज मुंबईत मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपला एकटं पाडायचं असेल तर देशभरातील विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून रणनीती आखली जात असल्याचं स्पष्ट होतंय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान हे मुंबईत येत आहेत.

‘मातोश्री’वर महत्त्वाच्या घडामोडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी केजरीवाल मुंबईत येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी केजरीवाल येणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नवी आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान देखील या बैठकीत उपस्थित राहाणार आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी मुंबई दौरा असल्याची देखील माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची ही राजकीय बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्रातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी विरोधी आघाडी तयार करण्याबाबतदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात विरोधकांची एकजूट करण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुंबईत बैठक बोलावणार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एकटं पाडण्यासाठी उद्धव ठाकरे देशातील विरोधकांची मोट बांधणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गट देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुंबईत सभा आयोजित करणार आहे. येत्या मार्च महिन्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांचं सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा देशातील विरोधी पक्षातील अनेक राष्ट्रीय नेत्यांशी दूरध्वनीवर संवाद सुरु आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.