अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार? देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सातत्याने जोर धरु लागतात. अनेकवेळा अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात. ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार? देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 3:36 PM

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत सातत्याने नवनव्या बातम्या येत असतात. कधी त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असतात, तर कधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली जातेय. याशिवाय अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा आपल्याला मुख्यमंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. आपण पाचवेळी उपमुख्यमंत्री बनलो, पण मुख्यमंत्रीपदी अद्याप विराजमान झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

या सगळ्या घडामोडींदरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मत व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका ‘हिंदी’ वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. आपण अजित पवार यांना सत्तेत का घेतलं? तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली होती? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली.

“ती आयडीया शरद पवारांची”

“विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडीया ही शरद पवारांची होती. मी इतक्या लवकर भूमिका बदलू शकत नाही. राष्ट्रपती शासन लागल्यावर एनसीपीलाही लेटर देण्यात आलं. हे एनसीपीचं लेटर माझ्या घरात तयार झालं. त्यावर त्यांनी सही केली. जेव्हा आमच्यासोबत शिवसेनेनं विश्वासघात केला तेव्हा पवारांनी आमच्यासोबत बातचीत केली. ते सरकार बनवण्यासाठी तयार होते”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“बदला पूर्ण केला असं मी म्हणालो. पण आता मी म्हणतो की, बदला घेणं योग्य नाही. लोकांचा अधिकार ठाकरे गटाचे प्रमुख ऊद्धव ठाकरेंनी हिरावला. आमची शरद पवारांसोबत कोणतीच बातचित नाही. आम्हाला संधी मिळाली आम्ही राजकारण केलं. तुमचा पक्ष का फुटतो? तुम्ही फुटू देऊ नका? अजित पवारांचॅ पारडं जड आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “विधानसभा अध्यक्षांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केस जास्त मजबूत आहे. उद्धव ठाकरे अफवा पसरवत आहेत की हे 16 आमदार बाद होतील”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस काय म्हणाले?

अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा वारंवार समोर येत असते. अखेर या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढू. राज्यात सीएम बदलणार नाहीत. अजित पवारांना बनवायची वेळ आली तर त्यांना 5 वर्षांसाठी बनवू”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

“भाजपच येत्या निवडणुकीत नंबर वन पार्टी बनेल. निर्णय पंतप्रधान घेतात, कुणाचं काय होणार? हे संसदीय बोर्ड करेल. पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन, मुंबईत थांबेन किंवा नागपूरला ही जाण्याची तयारी आहे. पतंगबाजीत काहीच महत्त्व नाही. राज्यात मी पुन्हा सरकार आणणार”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक.