AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा बलात्कार, फडणवीसांचा सरकारला महत्त्वाचा सल्ला

घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला घेरलं असून असे प्रकार न होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरचेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच राज्यात सध्या भयाचे वातावरण आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारचे कान टोचले आहेत.

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा बलात्कार, फडणवीसांचा सरकारला महत्त्वाचा सल्ला
देवेंद्र फडणवीस शनिवारपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 5:45 PM
Share

नागपूर : साकीनाका बलात्कार प्रकरणात पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून राज्य सरकारला जाब विचारण्यात येतोय. याच घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला घेरलं असून असे प्रकार न होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरचेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच राज्यात सध्या भयाचे वातावरण आहे, असे म्हणत चिंता व्यक्त केली आहे. (devendra fadnavis comment on dombivali minor gang rape said state government have to take some serious measures)

राज्यात भयाचं वातवरण, घटना चिंताजनक

डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार समोर आलाय. यावर बोलताना ” राज्यात सध्या भयाचं वातावरण आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आहे. सातत्याने या वाढत्या घटना चिंताजनक आहेत. राज्य सरकार, गृहमंत्रालय तसेच पोलिसांनी विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

तत्काळ लक्ष घालून विशेष प्रयत्न करणे गरजेचे

तसेच पुढे बोलताना डोंबिवलीसारख्या भागात अशा प्रकारच्या बलात्काराच्या घटना चिंताजनक असल्याचे फडणवीस म्हणाले. “डोंबिवलीसारख्या शांत भागात ही घटना होणं धक्कादायक आहे. सरकारने यामध्ये तत्काळ लक्ष घालून विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असं फडणवीस म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रियकराने बलात्कार करत व्हिडीओ बनवला, नंतर 29 जणांचा बलात्कार

प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला होता. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

पिडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार

जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला होता. हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.

इतर बातम्या :

पतीचा चारित्र्यावर संशय, संतापलेल्या पत्नीकडून 3 लाखांची सुपारी, नागपुरातील महिलेने नवऱ्याचा काटा काढला

पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात युवकाची हत्या, आठ दिवसात शहरात खुनाची सातवी घटना

एकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या

(devendra fadnavis comment on dombivali minor gang rape said state government have to take some serious measures)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.