AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठे गौप्यस्फोट ते ठाकरेंवर निशाणा, देवेंद्र फडणवीस यांच्या स्फोटक मुलाखतीमधील 10 महत्त्वाते मुद्दे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठे गौप्यस्फोट ते ठाकरेंवर निशाणा, देवेंद्र फडणवीस यांच्या स्फोटक मुलाखतीमधील 10 महत्त्वाते मुद्दे
| Updated on: Feb 14, 2023 | 12:02 AM
Share

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल (NCP) तर मोठमोठे गौप्यस्फोट केले. देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या पहाटेच्या शपथविधीवर अनेक दावे केले. 2019मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं काही तासांचं सरकार बनलं होतं. त्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती. त्यांच्याच संमतीने सगळं घडलं, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीतील 10 महत्त्वाचे मुद्दे :

1) ते जेलमध्ये टाकू शकले नसते. त्यांची तेवढी ताकदी नाही. तेवढी त्यांची हिंमत, क्षमताही नाही. पण मला जेलमध्ये टाकतील असं मी काही केलेलं नाही. पण त्यांनी मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत केला.

2) त्यांनी खोटे कागदे तयार करण्याचा प्रयत्न केला. मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आली होती. पण शेवटी मी पाच वर्ष गृह खात्याचा मंत्री होतो, असं फडणवीस म्हणाले.

3) माझेही गृह खात्यात संबंध आहेत. मी कधीही पैसे घेऊन पोस्टिंग केलं नाही. मी मेरीट पोहून लोकांना पोस्टिंग दिल्या ज्यांना कधी अपेक्षाही नव्हत्या की अशा पोस्ट मिळू शकतात. कधी कुणाचा अपमान केला नाही. त्यामुळे माझ्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठं प्रेम होतं. त्यामुळे ते जे प्रयत्न ते सगळे प्रयत्न मला समजायचे. तसेच ते जे प्रयत्न करायचे त्यामध्ये त्यांना कुणी मदतही करायचं नाही. कारण अधिकाऱ्यांनाही माहिती होतं की अशाप्रकारे वागणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी केली.

4) त्यांनी खूप केसेस तयार करण्याचा प्रयत्न केला. खोटे जबाब घेतले. अनेक अधिकाऱ्यांचे जे प्रोब्लेम होते त्यांना सांगायला सांगितलं की तेव्हाच्या गृहमंत्र्यांचे तसे आदेश होते, असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही अधिकाऱ्याने तसं काही केलं नाही. एका केसमध्ये खोटे कागदपत्रेही तयार करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही करु शकले नाही, असं फडणवीस म्हणाले.

5) पोलीस आयुक्तांची हिंमत होऊ शकत नाही. वरुन आदेश आल्याशिवाय हे होऊ शकत नाही. गृहमंत्र्यांच्या आदेशाने ते होऊ शकत नाही. कारण एक गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. तर दुसरे गृहमंत्र्यांनी मी ओळखतो. त्यामुळे ते असं करतील मला वाटत नाही. पण हे वरुन आदेश होतेच. पण पक्षाच्या नेत्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश होते, अशा अनेक गोष्टी असतील. शंभर टक्के माहिती महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होती. त्यांची मूक संमती होती की आदेश होते ते पाहावं लागेल, असं देखील ते म्हणाले.

6) मला काही लोकांनी सांगितलं की बदला घेतला असं म्हणू नका. म्हणून मी तसं म्हणणं सोडलं. माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते, असं फडणवीसांनी सांगितलं.

7) ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला, असा आरोप फडणवीसांनी केला.

8) दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.

9) राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती, असं देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले.

10) शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.