AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

Devendra Fadnavis on Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. तसंच थोड्याच वेळात एकनाथ शिदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
Devendra Fadnavis Eknath ShindeImage Credit source: ANI
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 27, 2024 | 3:24 PM
Share

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुती बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र अद्यापपर्यंत सत्तास्थापन झालेली नाही. त्यामुळे राज्यात नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार? याची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात सध्या मुख्यमंत्रिपदााबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेला लवकर उत्तर मिळेल. चर्चा चालू आहे. आधी मुख्यमंत्री ठरेल मग ते मंत्री ठरवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी ते बोलत होते.

मुख्यमंत्री कोण? फडणवीस म्हणाले…

मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. आमच्या श्रेष्ठींशी सर्वांशी चर्चा सुरू आहे . लवकरच आपल्याला उत्तर मिळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? यावर बोलताना आधी मुख्यमंत्री ठरेल मग मुख्यमंत्री हे मंत्री ठरवतील. आधी मुख्यमंत्र्यांची वाट पहावी, नंतर मंत्र्यांची वाट पाहावी, असं फडणवीस म्हणावे.

ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीने रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई लढण्याचं ठरवलं आहे. यावर फडणवीसांनी भाष्य केलं. याचे उत्तर काल सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की तुम्ही हारले म्हणजे ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे. ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे. हा रडीचा डाव आता बंद करायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. यात शिंदे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाबाबत काय बोलणार? हे पाहावं लागेल. एकनाथ शिंदे आज ठाण्यात आणि संध्याकाळी मुंबईत आमदारांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपासून शिंदे यांनी भेटीगाठी नाकारल्या होत्या. आता दुपारनंतर एकनाथ शिंदे ठाण्यात काही आमदारांना भेटणार आहेत. यानंतर ६ वाजता ते वर्षा बंगल्यावर येणार आहेत.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा