AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेन भारती यांच्यांसाठी का केले गेले विशेष पद, फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक आहे का?

देवेन भारतीय यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केली गेली आहे. मागील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देवेन भारती यांच्याकडे मुंबई सहआयुक्तपद होते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यांकडे होती.

देवेन भारती यांच्यांसाठी का केले गेले विशेष पद, फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक आहे का?
| Updated on: Jan 07, 2023 | 4:01 PM
Share

मुंबई: मुंबई पोलिसात (Mumbai Police) नुकताच नवा बदल करण्यात आला. आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांच्यांसाठी विशेष पद तयार करण्यात आलं. देवेन भारती आता थेट मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त झालेय. ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी मर्जीतले नेते समजले जातात. देवेन भारतीय यांची नियुक्ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या काळात नियुक्ती करण्यात आलेले मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना धक्का मानला जात आहे. दिल्लीच्या धर्तीवर हे पद तयार करण्यात आले आहे.

मुंबईत फक्त DG म्हणजे आयुक्ताचे पद होते. पण आता ADG म्हणजे विशेष पोलीस आयुक्त हे पद तयार करु शकलो नव्हतो. त्यामुळे आता ADG लेव्हलचं पद निर्माण केलं गेले असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विशेष पोलीस आयुक्त हे पद मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अधीनच हे पद आहे. त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचं आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलंय. तांत्रिकदृष्ट्या देवेन भारती यांचं पद हे मुंबईचे पोलीस आयुक्तांपेक्षा कमी दर्जाचं आहे. परंतु राजकीय दृष्ट्या मुंबई पोलीस दलात देवेन भारती आणि विवेक फणसळकर या दोन ips अधिकाऱ्यांपैकी नेमका कोणाचा दबदबा राहणार हे येत्या काळातच समजेल.

मुंबईतील कशी आहे पद्धत मुंबई एक आयुक्तालय आहे. आयुक्तांच्या अखत्यारित इतर सर्वांची कामे चालतात. मात्र विशेष आयुक्तांमुळे पोलीस दलाचे कामकाजाची विभागणी होणार आहे. देवेन भारती यांचे रिपोर्टींग पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे, आर्थिक गुन्हे शाखा, अभियान आणि वाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पाचही सहआयुक्तांच्या कामावर नियंत्रणाते काम देवेन भारती करणार आहे. त्यामुळे नवीन पदनिर्मिती फणसळकर यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा सुरु आहे.

फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक मुंबई मनपासाठी देवेन भारतीय यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केली गेली आहे. मागील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देवेन भारती यांच्याकडे मुंबई सहआयुक्तपद होते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यांकडे होती. मुंबईतील सर्व पोलीस ठाणी त्यांच्या अख्यत्यारीत होती. कोणाच्या प्रचार सभेला परवानगी द्यायची, कोणाला नाकारायची ही सर्व जबाबदारी भारतीकडे होती. यामुळे त्यांचा वापर २०१७ फडणवीस यांनी चांगलाच करुन घेतला होता. शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागा मागे भाजप होती. त्यामुळे येत्या निवडणुकीतही फडणवीस त्यांचा वापर करणार आहे आणि ठाकरे सरकारच्या काळात नियु्क्त झालेले विवेक फणसळकर यांनी सहकार्य केले नाही तर देवेन भारती मदतीसाठी उपयोगी होतील.

विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.