परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असेलेल्या गँगस्टर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या (Gangster Ejaz Lakdawala) मुलीला बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात पळून जात असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असेलेल्या गँगस्टर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक

मुंबई : कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या (Gangster Ejaz Lakdawala) मुलीला बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात पळून जात असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. लकडावाला याची मुलगी आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार होती आणि त्यानंतर कदाचित ती दुबईला जाण्याची शक्यता होती. मात्र, यापूर्वीच पोलिसांनी तिला अटक केली आहे (Ejaz Lakdawala Daughter Arrest).

गँगस्टर एजाज लकडावाला सध्या परदेशात असून मुंबई पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, परदेशात असल्याने पोलिसांचे हात अद्याप त्याच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. एजाज परदेशातूनही आपल्या हस्तकाद्वारे व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचे प्रयत्न करत असतो. काहीच दिवसांपूर्वी खार येथील एका व्यापाराला धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रयत्न एजाजच्या हस्तकाद्वारे करण्यात आले होते. यावरुन खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाचा भाऊ अकील लकडावाला याला अटक केली होती.

या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना अखिल लकडावाला याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गॅंगस्टर एजाज लकडावालाची मुलगी भारतातच वास्तव्यास असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार, लकडावालाची मुलगी सोनिया मनीषा अडवाणी हिच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस बजावली होती. 27 डिसेंबरला सोनिया आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई करत तिला अटक केली.

अटकेत असलेली सोनिया अडवाणी ही बनावट पासपोर्टच्या आधारे देश सोडून परदेशात जाणाच्या तयारीत होती. हा पासपोर्ट काढण्यासाठी तिने दिलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. सोनियाला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिला हॉलिडे न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने तिला सोमवारपर्यंत (30 डिसेंबर) पोलीस कोठडी सुनावली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI