AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांची शरद पवारांवर जोरदार टीका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छाती ठोकपणे…

Eknath Shinde on Amit Shah Statement About Sharad Pawar : अमित शाह यांनी पुण्यात बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलीय. वाचा...

अमित शाहांची शरद पवारांवर जोरदार टीका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छाती ठोकपणे...
एकनाथ शिंदेImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 21, 2024 | 8:29 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात त्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत. महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं. जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचं सरकार सत्तेत येतं. तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. अमित शाह यांच्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

खरं म्हणजे ते अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेले आहेत. आज ज्या पद्धतीने सरकारवर महाविकास आघाडी आरोप करत आहे. आज खरं म्हणजे मी छाती ठोकपणे सांगू की, आमच्या दोन वर्षाच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी आणू शकलं नाही. आम्ही सगळे जे निर्णय घेतलेले आहे ते सगळ्यांचे हिताचे निर्णय घेतलेले आहे. त्यामुळे अनेक वर्ष सत्तेमध्ये जे होते त्यांनी आमच्यावर आरोप करताना विचार केला पाहिजे. आपल्या स्वतःचा बघितलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी उद्गार केला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

‘धर्मवीर 2’वर शिंदे काय म्हणाले?

आज गुरुपौर्णिमा आहे. कालच गुरु पौर्णिमेच्या पूर्व संध्येला ‘धर्मवीर 2’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे. खऱ्या अर्थाने कालपासूनच गुरुपौर्णिमा सुरू झालेली आहे. ‘आनंद आश्रम’मध्ये दरवर्षीप्रमाणे आनंद दिघे साहेबांना करण्यासाठी शिवसैनिक येत असतात. परंपरा आणि ही परंपरा आजही कायम आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

गुरुपौर्णिमेनिमित्त आनंदाश्रमात दिघे साहेबांना वंदन करण्यासाठी सगळे आले होते. आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर धर्मवीर पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन चित्रपट आले. पण त्यांचं कार्य एक-दोन चित्रपटांमध्ये माऊ शकत नाही.म्हणून धर्मवीर पार्ट -2 लॉन्च केला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली आहे. आनंद दिघेसाहेब त्यांनी दाखवलं गेलेला मार्ग आणि जो काय विचार दिला ते आम्ही पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते आहोत. त्यांनी दिलेला विचार आणि दिशा मार्गक्रमण करण्याचं काम मुळे आमचे सरकार करत आहे. सरकार तसंच काम करत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.