Eknath Shinde : 16 लेडिज बार तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे, माझ्यावर 100हून अधिक केसेस; मुख्यमंत्र्यांनी सांगितला आंदोलनांचा इतिहास

आमचा बाप काढला गेला. रेडा म्हणाले. अनेक वाईट शब्द काढले. मी एकदम शांत असतो. मात्र अन्याय झाल्यावर मला शांत राहता येत नाही. माझे काम केसरकरांनी हलके केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : 16 लेडिज बार तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे, माझ्यावर 100हून अधिक केसेस; मुख्यमंत्र्यांनी सांगितला आंदोलनांचा इतिहास
पुढच्या निवडणुकीत २०० आमदार निवडून येणार Image Credit source: Vidhan sabha
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 3:56 PM

मुंबई : मी जावाचे रान केले. रक्ताचं पाणी केले. मी सतराव्या वर्षी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसैनिक (Shivsainik) झालो. 16 लेडिज बार तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे, माझ्यावर 100हून अधिक केसेस आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. विधानसभेत ते बोलत होते. शिवसेनेतून बंडखोरी आणि भाजपासोबत जाण्याची कारणे सांगितली. ते म्हणाले, मी वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. मी साहेबांना सांगितले सिनिअर लोकांना पद द्या, तेव्हा त्यांनी मला एक शिवी घातली आणि शाखाप्रमुख बनवले. मी नंतर नगरसेवक (Corporator) झालो. मात्र त्याच्या आधी होऊ शकलो असतो. युतीच्या माणसाला तिकीट द्यायचे ठरले. तेव्हा साहेब बोलले युतीचे बघू तुला तिकीट देतो. मी म्हटले जाऊ द्या साहेब आपण पुढच्या वर्षी बघू, मी कधी पदाची लालसा ठेवली नाही, असे ते म्हणाले.

‘आमचा बाप काढला तरीरी आम्ही शांत’

ठाण्यात लेडिज बारचा सुळसुळाट झाला होता. आम्ही पोलिसांना सांगितले, अर्ज देऊन थकलो. महिला म्हणायच्या, तुमच्या पोरांचा काय उपयोग आहे. शिव्या घालायच्या. यावेळी मी 16 लेडिज बार तोडणारा शिवसैनिक आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, की आमचा बाप काढला गेला. रेडा म्हणाले. अनेक वाईट शब्द काढले. मी एकदम शांत असतो. मात्र अन्याय झाल्यावर मला शांत राहता येत नाही. माझे काम केसरकरांनी हलके केले. त्यांना मी मीडियाला बोलायला सांगितले. बाप काढले, माझे वडील जिवंत आहेत. माझी आई गेली, एकादा गावी गेल्यावर उद्धव साहेबांचा फोन आला. आईने उद्धव साहेबांना सांगितले माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळ होतो. मला खूप कष्टाने वाढवले आहे, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘दिघे साहेबांनी आधार दिला’

पुढे ते म्हणाले, माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला. मात्र मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधीच निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. मी शिवसैनिक हेच माझे कुटुंब मानले. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला, माझी दोन मुले डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघे साहेबांनी आधार दिला. माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. कशासाठी जगायचे, कुणासाठी जगायचे. माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता होती. दिघे साहेब पाच, सहावेळा माझ्या घरी आले. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही म्हणून सांगितले. तेव्हा दिघे साहेब म्हणाले, तुला हे दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचे देव मानतो. मला सभागृह नेता केला. जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होता तरी त्याला माहीत होतं एकनाथ शिंदे खूप वेड्यासारखे कामाला लागला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.