ठाकरे गट पुन्हा अडचणीत, शिंदेंच्या शिवसेनेची या मुद्दावरुन उच्च न्यायालयात धाव
shiv sena controversy: ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन केलेले नाही. चिन्ह आणि पक्षाचे नाव आमच्याकडे आहे. त्यामुळे खरी शिवसेना आम्हीच आहोत. शिवसेना आम्ही आहोत ते शिवसेना नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये सुरु असलेले दावे-प्रतिदावे अजूनही सुरुच आहे. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा न्यायालयात रंगणार आहे. यासंदर्भात शिवसेना प्रवक्त भरत गोगावले यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती दिली. आम्ही ठाकरे गटाच्या विरोधात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.
का गेले उच्च न्यायालयात
ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन केलेले नाही. चिन्ह आणि पक्षाचे नाव आमच्याकडे आहे. त्यामुळे खरी शिवसेना आम्हीच आहोत. शिवसेना आम्ही आहोत ते शिवसेना नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनाही सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. ते काही करू शकतात. त्यांना जाऊ द्या, पण विजय हा आमचा होईल.
लाडकी बहीण योजनेवरुन नाराजी नाही
लाडकी बहीण योजनेचा पैसा हा प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातही जाणार आहे. लाडकी बहीण योजना ही जर इतर राज्यांमध्ये हिट झाली. ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुपर हिट होईल त्यामुळे कुठल्याही आमदारांनी त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. या योजनेवर अजितदादांची अजिबात नाराजी नाही. अधिकाऱ्यांमध्ये जर नाराजी असेल तर मला त्यांना एवढेच सांगायचे की त्यांनी योजना राबवायला हवी. कारण ही सगळ्यांच्या हिताचे आणि सगळ्यांनी मिळून हा एकत्रित निर्णय घेतलेला आहे.अजितदादा कुठे गायब नाही. ते पुण्यामध्ये आहे. पुणे अतिवृष्टी झाली आहे. यामुळे त्या ठिकाणी थांबून ते आढावा घेत आहेत.
राज ठाकरे महायुतीसोबत येणारच
राज ठाकरे लवकरच महायुती सोबत येतील. त्याबद्दल आम्हाला विश्वास आहे. त्यांनी महायुतीच यावे, असे आमचे त्यांना आवाहन आहे. शिवसेनेचे दुसरे नेते दीपक केसरकर यांनी राज ठाकरे महायुतीत येतील, असे म्हटले आहे. महायुतीमध्ये कुठले धुसफूस सुरू नाही. वर्षा बंगल्यावरती काय खलबते झाली? ते आम्हाला कळले नाही तुम्हाला कसे कळाले. त्यातील एक मुद्दा तुम्हाला कळला आहे.
