भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचं धाडसत्र, 5 ठिकाणी धाडी

भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचं आज सकाळपासून धाडसत्र सुरु आहे.

भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचं धाडसत्र, 5 ठिकाणी धाडी

विरार :  भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर आज सकाळपासून (शुक्रवार ता.22 जाने.) ईडीचं धाडसत्र सुरु आहे. ईडीने विवाशी संबंधित पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. आज सकाळपासून विरारमध्ये ईडीच्या धाडी सुरु आहेत. मनीलॉन्ड्रिंगच्या संबंधातून या सगळ्या धाडी टाकल्या जात आहेत. (Enforcement Directorate ED Raid Bhai thackur Viva Group)

विरारमध्ये विवा तसंच तिच्याशी संबंधित संस्थावर ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत. 5 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेल्या आहेत. विवा संस्थेशी संबंधित या पाचही धाडी पडलेल्या आहेत.

भारतभर गाजलेल्या पीएमसी घोटाळ्यात 5 ते 6 हजार कोटींचं मनीलॉन्ड्रिंग झालं होतं. यातले काही पैसे विवाशी संबंधित संस्थेमध्ये गुंतवण्यात आले होते. हा सगळा मनी ट्रेल ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोधला होता. याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई सुरु झाली आहे.

आज सकाळपासून ईडीने विवाशी संबंधित कार्यालयांवर तसंच विवाच्या मालकाच्या घरावर धाड टाकली आहे. काही महत्त्वाची कादगत्रे ईडीच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. आणखीही कारवाई सुरु आहे. कारलाई संपल्यानंतर तपासासंबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्याची शक्यता आहे.

ईडीच्या धाडी कुठेकुठे…?

विरारमधील विवा संस्थेच्या मालकाच्या घरावर पहिली धाड,

विवाशी संबंधित दोन कार्यालयांवर धाड,

तसंच संस्थेच्या संबंधित इतर दोन ठिकाणी ईडीच्या धाडी

पहिल्यांदा विवा संस्थेच्या मालकांच्या घरी धाड टाकण्यात आली. त्याशिवाय त्यांच्या चार कार्यालयांवर ई़डीची धाड

ईडीचं नेमकं काम काय…?

ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय… 1947 च्या कायद्याअंतर्गत ईडीची स्थापना झाली. 1956 ला स्थापनेच्या वेळी ईडीला एनफोर्समेंट यूनिट म्हणून ओळखलं जायचं. पण 1957 ला त्याचं नाव बदलून ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट) असं करण्यात आलं. ही एक इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते…

(Enforcement Directorate ED Raid Bhai thackur Viva Group)

हे ही वाचा

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे

रत्नाकर गुट्टेंची तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त, गंगाखेडच्या आमदाराला ED चा मोठा दणका

Published On - 11:49 am, Fri, 22 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI