‘सगळ्यांच्या डोक्यात हवा गेली’, उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर काँग्रेसमधून पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार यांचे थेट उत्तर… आता पुढे काय होणार?
Vijay Vadettiwar on Udhav Thackeray : तर राज्यातील विधानसभा निवडणुकांवरील मंथन अजूनही सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात पूला खालून बरंच पाणी गेलं. पण पराभवाचे शल्य म्हणा अथवा कवित्व ते काही कमी झालेले नाही.

विधानसभा निवडणुकांचे सूप वाजून तर आता नऊ महिने उलटले आहेत. लोकसभेत मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभेत बसलेला धक्का अजूनही सहजासहजी पचवता आलेला नाही. त्या जखमेवरील खपली निघल्याशिवाय काही राहत नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकांवरील मंथन अजूनही सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात पूला खालून बरंच पाणी गेलं. पण पराभवाचे शल्य म्हणा अथवा कवित्व ते शल्य काही कमी झालेले नाही.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हतं. ही तू तू मै मै झाली ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेचं यश सर्वांच्या डोक्यात गेलं. लोकसभेत महाविकास आघाडीत नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत तू तर तू आपल्याला जिंकायचं आहे, हा आपलेपणा होता. विधानसभेत नाही नाही मला जिंकायचं आहे. हा आपल्यातून मी पणा आला तेव्हा पराभव झाला, असे कान त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे टोचले.
हो, डोक्यात हवा गेली
उद्धव ठाकरे यांनी आरसा दाखवल्यानंतर महाविकास आघाडीतून आता त्याच्यावर प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी अजून मुलाखत पाहिलेली नाही बघिवतलेले नाही. हे खरं आहे लोकसभेत इंडिया आघाडीचा व्यवस्थित काम झालं,त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारले होते की सर्व जागा तिन्ही पक्षांना वाटला आम्हीच जिंकणार, त्यामुळे दीड महिना आम्ही चर्चेत घालवला.
प्रचार आणि प्लानिंग सोडून सुमारे 40 दिवस आमचे वाया गेले,28-30 बैठका झाल्या यामध्ये जो वेळ गेला, प्लॅनिंग करू शकलो नाही त्याचा नुकसान भोगावे लागलं. उद्धवजी जे म्हणत आहेत ते बरोबर आहे, कोणाकडे बोट दाखवणार नाही, प्रत्येकाला अधिक जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या होतात त्यातून प्रचंड नुकसान झालं हे खरं आहे, अशी कबुली वडेट्टीवार यांनी दिली.
- सगळ्यांच्या डोक्यात हवा गेली होती, उद्धवजींनी मान्य केलं मी मान्य करतो, लोकसभेनंतर अनेकांना वाटलं की आता आम्हीच मुख्यमंत्री होणार आहे. उद्धवजी बोलले ते खरं बोलले आणि मी बोलतो ते पण खरं बोलतोय हा घोळ दोन तीन प्रकारे झाला, असे ते म्हणाले.
- प्रत्येक राज्याचा पाहिलं तर विरोधकांना पूर्णपणे नामशेष करण्याचं भाजपचे रणनीती आहे.
- संविधानाची हत्या करून मतदारांचे मत चोरून कसही निवडणुका जिंकायचा
- निवडणुकीपूर्वी सत्तेतील लोकांविषयी प्रचंड रोष जनतेत होता, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यात फरक पडतो का?
- आम्ही त्यासाठीपात्र आहोत की नाही, निर्णय हा आमच्या अधिकारात आणि दृष्टीक्षेपात नाही, त्यामुळे स्वतः अशा गोष्टी करून घोषणा, त्यावेळी अनेकांच्या डोक्यात ते वारं घुसलं होतं आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती.
- त्यातून जागा वाटपाचा मोठा घोळ झाला, मतदार यादीत घोळ होता त्यात आम्हाला लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही, असे प्रांजळ मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
