“कल भी वो हारे थे आज भी वो हारेंगे, कल भी हम जिते थे आज भी हम जितेंगे”, अजित नवलेंचा राजभवनावर जाण्याचा निर्धार

कल भी वो हारे थे आज भी वो हारेंगे, कल भी हम जिते थे आज भी हम जितेंगे, अजित नवलेंचा राजभवनावर जाण्याचा निर्धार
अजित नवले, अखिल भारतीय किसान सभा

Farmer protest in Mumbai : कोणत्याही परिस्थिती राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देणार असल्याचं अजित नवलेंनी सांगितले आहे.

Yuvraj Jadhav

|

Jan 25, 2021 | 1:52 PM

मुंबई: अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनावर घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची देखील आहे. राज्याच्या राज्यपालांकडे जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. शेतकरी त्यांचं म्हणनं राज्यपालांकडे जायचं आहे. राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देऊ, असं अजित नवले म्हणाले. आझाद मैदानावर जमलेले सर्व शेतकरी राजभवनाकडे जाणार आहोत. ज्या ठिकाणी अडवलं जाईल तिथे आम्ही थांबून आंदोलन करु, असा इशारा अजित नवले यांनी दिला. ( Farmers Protest in Mumbai Ajit Nawale said at any cost farmers will go to Governor office)

अजित नवले यांनी यावेळी राज्यपालांना निवेदन दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं सांगितले. सर्व शेतकरी राजभवनाकडे जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आझाद मैदानात जमलेले 50 हजार शेतकरी राजभवनाकडे जाण्याचा प्रयत्न करतील. आम्हाला ज्या ठिकाणी अडवलं जाईल तिथे थांबू पण राज्यपालांना निवेदन देणार असल्याचा निर्धार केल्याचं अजित नवलेंनी सांगितलं. कायद्याच्या चौकटीत आणि शातंतेत निवेदन देण्याचा आमचा अधिकार आहे, असं नवले म्हणाले.

Farmer Protest in Mumbai | मुंबईच्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?

गिरीश बापटांना प्रत्युत्तर

भाजप नेते खासदार गिरीश बापट यांनी कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका मांडली. यावर बोलतना अजित नवलेंनी गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेत्यांना बोलायला काय जातं, संपूर्ण देश नरेंद्र मोदींच्या विरोधात गेला आहे. राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सर्व जण एक होऊ आणि भाजपला एकट पाडू, असं नवले म्हणाले. गिरीश बापटांच्या फालतू बडबड केली तर त्याचा जास्त फरक पडत नाही, असं प्रत्युत्तर गिरीश बापटांना अजित नवलेंनी दिलं आहे.

विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांचं लाल वादळ आज राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नाही. दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत‌ नाही, असा कोर्टाचा आदेश आहे, असं स्पष्टीकरण मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलंय.

शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू : विश्वास नांगरे पाटील

गिरीश बापट काय म्हणाले?

शेतकऱ्यांनी आंदोलने शांततेने करावीत. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे करतंय त्यामागे त्यांनी उभं राहावं. कोणाच्यातरी नेतृत्वाखाली जाऊन आपलं नुकसान करून घेवू नये, असं आवाहन भाजप खासदार गिरीश बापट यांनी केले. केंद्र सरकारचे कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, असं गिरीश बापट म्हणाले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? (Major Demands of Farmer Protest in Mumbai)

  1. कंत्राटी कामगार प्रथा तसेच शेतकरी कामगार विरोधी कायदे रद्द करणे.
  2. शेतकरी विरोधी केलेले तीन काळे कायदे रद्द करा.
  3. देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनी खालसा करुन 7/12 वरिल नावं पूर्ववत करा.
  4. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा.
  5. शेतमाला भाव देण्यासाठी हमी भाव कायदा करा.
  6. शेतकरी विरोधी वीज बिलाचा कायदा मागे घ्या.
  7. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

‘पवार साहेब, इकडे लक्ष द्या’; मराठा क्रांती मोर्चाचे आझाद मैदानात बॅनर्स!

( Farmers Protest in Mumbai Ajit Nawale said at any cost farmers will go to Governor office)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें