शेतकरी थकतील असे वाटत असेल तर ती केंद्राची चूक; नवाब मलिक यांनी सुनावले

केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहेl तर ही त्यांची भूल आहे... शेतकरी कधीही थकणार नाहीत, त्यामुळे वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांसोबत चर्चा करा, कायदे रद्द करा, असा इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

शेतकरी थकतील असे वाटत असेल तर ती केंद्राची चूक; नवाब मलिक यांनी सुनावले
नवाब मलिक

मुंबई : केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहेl तर ही त्यांची भूल आहे… शेतकरी कधीही थकणार नाहीत, त्यामुळे वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांसोबत चर्चा करा, कायदे रद्द करा, असा इशारा अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. (Farmers will not stop, Nawab Malik warns Modi government)

देशात तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा सुरुवातीपासून आहे. परंतु शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे, मात्र याबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही. याबाबत पक्षातंर्गत चर्चा करुन त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय होईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबाबतची भूमिका शेतकऱ्यांची आहे त्याला सुरुवातीपासून पाठिंबा राहिलेला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, ही भूमिका पक्षाची आहे. नवीन कायदा करण्याचा अधिकार सरकारला असतो. लोकांना विश्वासात घेऊन कायदा केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. कायदा बदलून नवीन कायदा करता आला असता पण आम्ही एक पाऊल मागे घेणार नाही, ही मोदी सरकारची भूमिका राहिली आहे त्यामुळे शेतकरी आंदोलन लांबले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

27 सप्टेंबरला भारत बंदची हाक

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

सरकारने जानेवारीपासून संवाद बंद केला

मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागून केलेल्या कृषी कायद्यांना परत घ्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चांतून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेस टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेळावे भरवत आहेत. तसेच या महापंचायतीमध्ये राकेश टिकैत केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत.

27 सप्टेंबर रोजी भारत बंद

महापंचायतीदरम्यान राकेश टिकैत एखादी मोठी घोषणा करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. टिकैत यांनी कृषी आंदोलनबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. याआधी किसान मोर्चाने 25 सप्टेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल असे सांगितले होते.

पिकाला भाव नाही, तर मत नाही

शेतकरी मोर्चाने आयोजित केलेल्या आजच्या महापंच्यातीला हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. मुजफ्फरनगर येथील मैदान आज खचाखच भरलेले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर निवडणुकीत मतदानही मिळणार नाही, असे सांगितले. “ही लाढाई ही कृषी कायदे आणि किमान आधारभूत किंमत यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकरी मतदान करणार नाहीत. आता मतदानाच्या माध्यमातून आपल्याला घाव घालावा लागेल,” असे टिकैत म्हणाले.

इतर बातम्या

कोथळा काढणं म्हणजे नक्की काय?, चंद्रकांतदादांना पुरेंदरेंचं शिवचरित्रं पाठवू, त्यांनी वाचावं; राऊतांचा खोचक टोला

अजितदादांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला?; राऊतांचा हल्लाबोल सुरूच

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, वडेट्टीवारांचं पडळकरांना आव्हान; 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा

(Farmers will not stop, Nawab Malik warns Modi government)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI