दिशा सालियन बदनामी प्रकरणी नारायण राणे, नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल, राणे पिता-पुत्रांना आरोप भोवणार?

दिशा सालियनची बदनामी केल्या प्रकरणी सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा सालियन बदनामी प्रकरणी नारायण राणे, नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल, राणे पिता-पुत्रांना आरोप भोवणार?
दिशा सालियन बदनामी प्रकरणी नारायण राणे, नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 9:41 AM

मुंबई: दिशा सालियनची (Disha Salian case) बदनामी केल्या प्रकरणी सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियनप्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याची सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

राणेंचं नेमकं ट्वीट काय?

याप्रकरणी नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं.

काय आहे प्रकरण?

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होती. तसेच दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याचीही चौकशी केली जात होती. त्याशिवाय दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यानतंर याप्रकरणाची मालवणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी पोलिसांनी तपास पूर्ण केला होता. नुकतंच पोलिसांकडून याबाबतचा रिपोर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना आढळलेले नाही, असे नमूद करण्यात आले आहे होते.

संबंधित बातम्या:

दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग, कॉल नेमके कोणी केले? तपास नाही

सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृतदेहावर कपडे नव्हते, पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

महिलेची छेड काढून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या नालासोपारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या, घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.