महिलेचं 17 वर्षीय मुलाशी लग्न, पाच महिन्यांचं बाळ, महिलेवर गुन्हा

मुंबई : मुंबईत महिलेने अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचे वय 17 वर्षे 8 महिने असून, महिलेचे वय 22 वर्षे आहे. मात्र, आम्ही संमतीने संबंध ठेवून, पुढे लग्न केल्याचा दावा आरोपी महिलेने केला आहे. आरोपी महिला उद्या (1 […]

महिलेचं 17 वर्षीय मुलाशी लग्न, पाच महिन्यांचं बाळ, महिलेवर गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : मुंबईत महिलेने अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचे वय 17 वर्षे 8 महिने असून, महिलेचे वय 22 वर्षे आहे. मात्र, आम्ही संमतीने संबंध ठेवून, पुढे लग्न केल्याचा दावा आरोपी महिलेने केला आहे. आरोपी महिला उद्या (1 डिसेंबर) जामिनासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे आणि उद्याच कोर्टात जामिनावर निर्णयही होण्याची शक्यता आहे.

आरोपी महिलेला 5 महिन्यांची मुलगी सुद्धा आहे. आरोपी महिलेला सध्या भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिच्यासोबतच तिच्या पाच महिन्यांच्या मुलीलाही ठेवण्यात आले आहे. पोस्कोसह अपहरण, धमकीचा गुन्हा, तसेच बालविवाह कायदा या अन्वये आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

आरोपी महिलेने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2017 रोजी मुलाशी लग्न केलं होतं. या दोघांना 5 महिन्याची मुलगी आहे.

21 वर्षाखालील मुलांना आणि 18 वर्षाखालील मुलींना विवाह करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुलगा 17 वर्षांचा असल्याने आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलाच्या आईचे आरोप काय?

17 वर्षीय मुलाच्या आईने आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली असून, आपल्या मुलाला फसवून लग्न केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या तक्रारीनुसार गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली.

गेल्या वर्षी नेमकं काय झालं?

गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरला आरोपी महिला मुलाच्या घरी गेली आणि तुमच्या मुलासोबत लग्न केलं असून, आम्ही आता वेगळे राहणार आहोत, असे सांगू लागली. यावेळी मुलाच्या आई-वडिलांनी विरोध केल्यानंतर, आरोपी महिलेने त्यांना धमकी दिली. स्वत:ला काहीतरी बरे-वाईट करुन घेण्याचा इशारा देत ब्लॅकमेल केलं.

आरोपी महिलेचे याआधी दोन लग्न झाले असून, दोन्ही वेळा घटस्फोट झाल्याची माहिती मुलाच्या आईने दिली.

लग्नाच्या दोन वर्षांआधीपासून मुलगा आणि आरोपी महिला एकमेकांना ओळखू लागले होते. तेव्हापासूनच मुलाच्या वागण्यातही बदल सुरु झाला होता. मला भेटलास नाही, तर आत्महत्या करेन, अशी धमकी आरोपी महिला मुलाला देत होती, असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. एकदा अंगावर रॉकेल ओतून आणि किटकनाशकं खाऊन आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता. या सगळ्या मानसिक त्रासामुळे मुलगा दहावीत नापास झाला होता.

आरोपी महिलेचा दावा काय?

आरोपी महिलेने आता कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा आहे, हा त्याच्या आईचा दावा खोडून काढला आहे. मुलाची बहीण 18 वर्षांची आहे, त्यामुळे मुलाची बहीण आणि मुलगा यांच्यातील वयाचं अंतर पाहता, मुलाचे वय 17 वर्षे 8 महिन्यांचा असूच शकत नाही, असाही दावा आरोपी महिलेने केला आहे. तसेच, मुलासोबत संमतीने संबंध होते, शिवाय याधीच्या आयुष्यात आपल्यावर एकही गुन्हा नसल्याचा दावाही आरोपी महिलेने केला आहे.

Non Stop LIVE Update
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.