AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, कार्यक्रमाच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन येत्या 31 मार्चला होण्याची शक्यता आहे. (balasaheb thackeray national memorial )

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, कार्यक्रमाच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न
बाळासाहेब ठाकरे
| Updated on: Mar 29, 2021 | 9:14 PM
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे (Balasaheb Thackeray National Memorial) भूमिपूजन येत्या 31 मार्चला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यक्रमाची परवानगी मिळवण्याठी राज्य सरकारकडून कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राज्यात सध्याच्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. (foundation stone of Mumbai Balasaheb Thackeray National Memorial will be laid on 31 March)

मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील शिवाजी पार्कमधील महापौरांच्या जुन्या निवास्थानी होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन येत्या 31 मार्चला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. सध्या राज्यात कोरोना संसर्ग वाढलेला असल्यामुळे मोजक्याच मान्यवरांमध्ये हा भूमिपूजन सोहळा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारने विशेष परवानगी घेण्यासाठी कार्यवाहीसुद्धा सुरु केली आहे. तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या स्मारकाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरीला चालना मिळाली होती. त्यानंतर आताच्या ठाकरे सरकारमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे या स्मारकाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

स्मारकाचे काम दोन टप्प्यांत होणार 

मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एकूण 400 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात लेझर शो,व्हर्च्यूअल रियालिटी शो आदी उभारण्यावर भर

दुसऱ्या टप्प्यात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अद्ययवतीकरणावर काम केले जाईल. राज्य सरकारकडून बाळासाहेबांच्या स्मारकासाठी दुसऱ्या टप्प्यात 150 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामं केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना ही कामं केली जातील.

दरम्यान, सध्या 31 मार्च रोजी स्मारकाचे भूमीपूजन होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग वाढेलाला असल्यामुळे भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

इतर बातम्या :

‘सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं’, संजय राऊतांचं मोठं विधान

(foundation stone of Mumbai Balasaheb Thackeray National Memorial will be laid on 31 March)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.