AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 1 हजार युवासेना पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त (13 जून) खासदार राहुल शेवाळे आणि युवासेनेच्या वतीने युवासेनेच्या सुमारे 1000 पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले.

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 1 हजार युवासेना पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण
vaccination
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 6:15 PM
Share

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त (13 जून) खासदार राहुल शेवाळे आणि युवासेनेच्या वतीने युवासेनेच्या सुमारे 1000 पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले. दादरच्या सूर्यवंशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष लसीकरण मोहिमेत खासदार राहुल शेवाळे यांच्यासह आमदार सदा सरवणकर, महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर – नगरसेविका श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, सभागृह नेत्या विशाखा राऊत, युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यावेळी उपस्थित होते. (Free Corona vaccination of 1000 Yuvasena workers on occasion of Aditya Thackerays birthday)

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या वतीने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेसाठी खासदार शेवाळे यांच्या वतीने सुमारे एक हजार कोव्हिशील्ड लसी उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी साई हॉस्पिटल आणि मंगल चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले. अशाच रीतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरातही विशेष लसीकरण मोहीम लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षभरापासून सामान्य जनतेला वैद्यकीय आणि इतर मदत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कोव्हिड योद्धा म्हणून चोख कामगिरी बजावली. यामुळेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, युवासेनेच्या कोव्हिड योद्ध्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

इतर बातम्या

ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा

1.35 कोटी खर्चून मुंबईतील दोन उद्यानांचं सुशोभिकरण, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भूमिपूजन

(Free Corona vaccination of 1000 Yuvasena workers on occasion of Aditya Thackerays birthday)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.