मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून धावणार एसी लोकल, ‘असे’ असणार वेळापत्रक

मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून धावणार एसी लोकल, 'असे' असणार वेळापत्रक
एसी लोकल

मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. उद्यापासून हार्बर मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने वातानुकूलित उपनगरीय लोकल सेवा सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते गोरेगावदरम्यान एसी लोकल धावणार आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 02, 2022 | 2:37 PM

मुंबई :  मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. उद्यापासून हार्बर मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने वातानुकूलित उपनगरीय लोकल सेवा सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते गोरेगावदरम्यान एसी लोकल धावणार आहेत. एसी लोकल सुरू केल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. या एसी लोकलची सेवा गोरेगाव, वाशी, पनवेल, वाद्रे या मार्गावर देखील उपलब्ध असणार आहे. दर रविवारी मात्र या मार्गावरून नॉन एसीच लोकल धावणार आहेत. वातानुकूलित सेवा म्हणून उद्यापासून चालवण्यात येणाऱ्या एसी लोकलचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

लोकलचे वेळापत्रक

98802- B2 वांद्रे प्रस्थान 04:17 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 04: 48  वाजता.

98011 – PL9 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान 04:52 वाजता पनवेल आगमन 06:12 वाजता.

98022 – PL22 पनवेल प्रस्थान 06:29 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 07:48 वाजता.

98815 – B15 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान 07:51 वाजता वांद्रे आगमन 08:20 वाजता.

98818 – B18 वांद्रे प्रस्थान 08:28 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 08:58 वाजता.

98723 – GN23 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान 09:02 वाजता गोरेगाव आगमन 09:56 वाजता.

98730 – GN30 गोरेगाव प्रस्थान 10:06 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 11:04 वाजता.

98523 – V21* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 11:08 वाशी आगमन 11:57  वाजता.

98556 – V44 वाशी 16:44 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 17:33वाजता.

98759 – GN59* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान 17:37  वाजता गोरेगाव आगमन 18:31 वाजता.

98766 – GN66* गोरेगाव प्रस्थान 18:41 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 19:40 वाजता.

98553 – V49* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 19:44 वाशी आगमन 20:34 वाजता.

98578 – V64* वाशी प्रस्थान 20:49 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 21:38 वाजता.

98241 – PL189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान 21:42 वाजता पनवेल आगमन 23:02 वाजता.

98244 – PL198 पनवेल प्रस्थान 23:13 वाजता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन 0032 वाजता.

98803 – B3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान 0036 वाजता वांद्रे आगमन 01:04 वाजता.

ट्रान्सहार्बर मार्गावरील 16 एसी लोकल बंद होणार

या एसी लोकल सेवा रविवार/सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसतील त्याच्या जागी सामान्य बिगर एसी लोकल चालवण्यात येणार आहेत.  सध्या ट्रान्सहार्बर लाईनवर चालणाऱ्या 16 वातानुकूलित उपनगरीय सेवांना अत्यल्प प्रतिसाद असल्याने त्या 31 जानेवारीपासून बदलून नॉन एसी करण्यात येणार आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा अगदीच कमी प्रतिसाद  आहे. नोव्हेबंर महिन्यात सरसरी 1197 तर डिसेंबर महिन्यात सरासरी केवळ 1052  प्रवाशांनी या मार्गावर एसी लोकलने प्रवास केला आहे.

संबंधित बातम्या

Ajit Pawar on Rane| उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शेलकी टोलेबाजी; म्हणाले, राणेंनी उणीदुणी काढण्यापेक्षा…

Mumbai Bank Election | मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी आज निवडणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Megablock | 24 तास महा-मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें