सावधानता बाळगा अन्यथा कोरोना पुन्हा येईल; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. (Governor Bhagat Singh Koshyari felicitates 40 Corona Warriors from Mumbra, Kausa)

सावधानता बाळगा अन्यथा कोरोना पुन्हा येईल; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. केरळ व महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. करोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आताही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल, असा इशारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला. तसेच प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घेतल्यास करोनाचा पराभव निश्चित आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Governor Bhagat Singh Koshyari felicitates 40 Corona Warriors from Mumbra, Kausa)

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात करोना संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता राजन किणे उपस्थित होत्या. याप्रसंगी कोश्यारी यांनी हा इशारा दिला.

कोरोना संकटात समाज एकवटला

राज्यात कोरोनाचं संकट निर्माण झालं तेव्हा राज्यातील सर्व लोकांनी परस्पर सहकार्याने काम केले. एक दुसऱ्याला मदत केली. डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केलेच परंतु या काळात विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केले, असं कोश्यारी यांनी आवर्जून सांगितलं. करोना संसर्गाच्या काळात लोकांनी पोलिसांवर पुष्पवर्षाव केला ही अनोखी घटना या काळात पाहायला मिळाली, असंही त्यांनी नमूद केलं.

तर कोरोनाचा पराभव निश्चित

ईश्वर केवळ मंदिर, मस्जिद व इतर धार्मिक स्थळांपुरता मर्यादित नसून तो सर्व जनाजनात वास करीत आहे, हे जाणून लोकांनी या काळात भगवान बुद्ध व महात्मा गांधींचा करुणा भाव जागविला. लोकांमधील सेवा, समर्पण व करुणा भाव टिकून राहिला तर करोनासारखी कितीही संकटे आलीत तरीही त्यांचा निश्चित पराभव होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Governor Bhagat Singh Koshyari felicitates 40 Corona Warriors from Mumbra, Kausa)

योद्ध्यांचा सन्मान

यावेळी कोरोना काळात जीवावर उदार होऊन सेवा करणाऱ्या विविध योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. समाजसेवी धनंजय गोसावी, रक्तदाते करण किणे, डॉ संदीप पाटेकर, डॉ हेमांगी घोडे, डॉ अस‍िफ पोची, डॉ रावुत मोईनुददीन, डॉ शर्मीन शब्बीर डिग्रा, डॉ सुदर्शन सोनोणे, डॉ मुमताझ शाह, डॉ कनक राजू गंगाराम, अग्निशामन विभागातील तंबेश्वर मिश्रा, अग्निशामन विभागातील हितेश प्रकाश राऊत, अविनाश किणे (मरणोत्तर), पत्रकार खलील शरीफ गिरकर, पत्रकार युसुफ पुरी, ठाणे पोलीस हवालदार जुलालसिंग विठठल परदेशी, ठाणे पोलीस शांताराम प्रभाकर सावंत, मुकादम सफाई कर्मचारी महेश धनाजी भागराव, समाजसेवी अब्दुला सुभान शेख, समाजसेवी मोहम्मद अरिफ मोहमद इकबाल शेख, जुझर इस्माईल पेटीवाला, अन्वर अल‍ि मोहमद नुरी, निर्मल सोलंकी, मोहम्मद ओन मोमीन, परवेझ एम ए फरीद, चांद कुरेशी, तृप्ती किणे, अरिफ खान पठान, राजेश देवरुखकर, आकाश पाटील, किशोर बाटेकेर, आरती राहटे, बापु मखरे, ठाणे महानगर पालिकेतील कर विभागातील गिरीश रतन अहिरे, ठाणे महानगर पालिकेतील गिरीश मोरे, नैनेश भालेराव, अनिता किणे, राजन किणे, मोरेश किणे यांना यावेळी राज्यपालांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. (Governor Bhagat Singh Koshyari felicitates 40 Corona Warriors from Mumbra, Kausa)

 

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात, नवरदेवासह बाप, भाऊ-भावजय पॉझिटिव्ह, वऱ्हाडी क्वारन्टाईन!

महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी करायची का?, काँग्रेसचं तीन दिवस मंथन; मॅरेथॉन बैठकीकडे सर्वांचं लक्ष

(Governor Bhagat Singh Koshyari felicitates 40 Corona Warriors from Mumbra, Kausa)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI