AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : CSMT च्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर हार्बर रेल्वेचा डबा रुळावरून घसरला, वाहतूक ठप्प

ऐन सकाळच्या प्रहरीच ही घटना घडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. पनवेलकडे मार्गस्थ होणाऱ्या लोकलबाबत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही या मार्गावरील रेल्वे वाहतूक ही काळापर्यंत का होईना ठप्प राहणार आहे.

Mumbai : CSMT च्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर हार्बर रेल्वेचा डबा रुळावरून घसरला, वाहतूक ठप्प
छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर हार्बर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला.
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 11:07 AM
Share

 मुंबई :  (CSMT) छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर (Harbal Railway Station) हार्बर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला आहे. त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झाली होती. घटनेनंतर लागलीच (Railway Administration) रेल्वे प्रशासनाने या रेल्वेरुळावरील वाहतूक बंद ठेवली आहे. ऐन सकाळच्या प्रहरीच ही घटना घडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. वाशीकडे मार्गस्थ होणाऱ्या (Local Railway) लोकलबाबत हा प्रकार घडला आहे. लोकल मार्गस्थ होण्याऐवजी पाठीमागे येत होती. त्यादरम्यान ही घटना घडली आहे. सुदैवाने यामध्येही कोणीही जखमी नाही. रुळावरुन रेल्वे घसरली आणी प्लॅटफॉर्मचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे मार्गावरील रेल्वे वाहतूक ही काळापर्यंत का होईना ठप्प राहणार आहे.

हर्बल मार्गावरील वाहतूक विस्कळीत

रेल्वेच्या रुळावरुन डबाच घसरल्याने या मार्गावरील वाहतूक आता बंद ठेवण्यात आली आहे. ऐन वर्दळीच्या वेळीच ही घटना घडली आहे. सकाळी 10 च्या दरम्यान चाकरमान्यांची ये-जा करण्याची ही वेळ असते. शिवाय कार्यालयीन कामकाजासाठी अनेकजण लोकलचाच आधार घेतात. असे असताना रेल्वेचा डबाच घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर आता लोकलच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

प्लॅटफॉर्म दोनवरुन वाहतूक

हर्बलकडून पनवेलकडे लोकल मार्गस्थ होत असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी लागलीच पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे ह्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन सोडण्यास सुरवात झाली आहे. गैरसोय टाळता यावी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अचानक ही घटना घडली असली तरी लोकलचा वेग मर्यादित असल्याने यामध्ये कोणी जखमी झाले नाही.

तीन तासानंतर वाहतूक पूर्वपदावर

हार्बर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला असल्याने आता या मार्गावरील वाहतूक ही बंद आहे. शिवाय आता दुरुस्तीच्या कामासाठी तीन तासाचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे पनवेलकडे मार्गस्थ होण्यासाठी प्रवाशांना आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर जावे लागणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.