विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप
"लोकं 1-1:30 वाजता आलेत, त्यांची पहिली स्क्रुटनी होते, मात्र अर्ज स्वीकारणं लोकांचा हक्क आहे. मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत, गगराणी देखील दोषी आहेत. पोलिसांनी जाऊ दिलं नाही ते देखील जबाबदार आहेत"

“30 तारीख शेवटची होती. 5 वाजेपर्यंत कार्यालयात यायला पाहिजे हा नियम आहे. जे लोकं आत आलेत, दोन गेट आहेत. बूथ लावले आहेत, तिथे माणसं बसवली आहेत. आम्हाला टोकन दिलं. बाकी लोकांची छाननी सुरु होती. आमच्याकडून डिपॉझिट घेतलं गेलं, चेकलिस्ट आहे. मग प्रॉपर्टी त्यांची झाली आणि मग 10 पावलावर दुसरं ऑफिस होतं. 12 उमेदवार होते, त्यांचे अर्ज राहिले. नार्वेकर मला बोलले काय तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामं करुन घेता आणि अर्ज आमच्याविरोधात अर्ज भरता” असं हरिभाऊ राठोड म्हणाले. “नार्वेकर 5 वाजेपर्यंत इथे होते, येरझाऱ्या मारत होते. मला त्यांनी धमकी दिली, सिक्युरिटी कोणी दिली तुम्हाला?. तुम्ही संवैधानिक पदावर आहात, तुम्हाला शोभत नाही असं मी बोललो” असं हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं.
“तुम्हाला बिनविरोध करायचं आहे यासाठी आम्हाला धमक्या देत होते. नार्वेकर संवैधानिक पदावर आहेत, तरी ते असे वागले. गगराणी साहेबांना आम्ही हे सगळं सांगितलं. आम्ही रिपोर्ट मागवतो असं ते म्हणाले. आमचे अर्ज त्यांनी घ्यायला पाहिजे, 12 लोकं आहेत. आम्ही सोडणार नाही त्यांना. स्क्रुटनी 31 ला होते, तर आधीच केली त्यांनी” असं हरिभाऊ राठोड म्हणाले.
एबी फॉर्म कोणी उशिरा दिला नाही
“लोकं 1-1:30 वाजता आलेत, त्यांची पहिली स्क्रुटनी होते, मात्र अर्ज स्वीकारणं लोकांचा हक्क आहे. मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत, गगराणी देखील दोषी आहेत. पोलिसांनी जाऊ दिलं नाही ते देखील जबाबदार आहेत. आरओ यांनी पैसे भरुन घेतले आणि अर्ज घेतला नाही. सगळ्यांनी उशिरा एबी फॉर्म दिलेत. एबी फॉर्म कोणी उशिरा दिला नाही. आम्हाला 8-8 दिवस आधी मिळाले. आरओ निलंबित झाले पाहिजे. गगराणी यांच्यावर कारवाई केली पाहिजे” अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली.
अर्ज आम्ही विड्रो करणार नाही
“आमचे फॉर्म घेतलेत, मग त्यांनी त्यांची प्रॉपर्टी आम्हाला का दिली?. सरकारची रिसिप्ट आहे आमच्याकडे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी चेक केलेत. टोकन आम्हाला दिलेत. पण त्यांनी नाकारलं की टोकन आम्ही दिले नाहीत. अर्ज आम्ही विड्रो करणार नाही, आम्ही निवडणूक लढणार. नार्वेकर यांच्या भावाचा अर्ज जर बिनविरोध तर समजून जा यांनीच माघार घ्यायला लावली” असं हरिभाऊ राठोड म्हणाले.
