AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर चाललोय… राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून या संदर्भात विधान केली जात आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर युती होणारच असं आक्रमकपणे सांगितलं जात आहे.

मातोश्रीवर चाललोय... राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2025 | 3:17 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी तर काल या संदर्भात सूचक विधान करत मी तुम्हाला बातमीच देणार आहे, असं म्हटलं. त्यानंतर आज दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर गेल्या कित्येक वर्षानंतर राज ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला. त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज राज ठाकरे यांनी मात्र पत्रकारांची फिरकी घेतली. राज ठाकरे यांनी पत्रकारांना जवळ बोलावून मी मातोश्रीवर चाललोय, असं म्हणत पत्रकारांची फिरकी घेतली. राज यांच्या या अनपेक्षित विधानामुळे पत्रकारही काही काळ गोंधळून गेले होते.

राज ठाकरे यांची गाडी शिवतिर्थाबाहेर आली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सर्व पत्रकारांना जवळ बोलावलं. यावेळी पत्रकार गाडीजवळ गेले आणि कुठे दौरा? असा सवाल राज ठाकरे यांना केला. त्यावर हजरजबाबी राज यांनी कोणतेही आढेवेढे न घेता मातोश्रीवर चाललोय असं म्हटलं. त्यामुळे क्षणभर काय बोलावं हेच पत्रकारांना कळलं नाही. सर्वचजण फक्त राज ठाकरे यांच्याकडे पाहात राहिले. यावेळी राज यांनी स्मितहास्य करताच राज ठाकरेंनी आपली फिरकी घेतल्याचं पत्रकारांच्या लक्षात आलं आणि त्यांनाही हसू आवरणं कठिण झालं.

उद्धव ठाकरेंनी उडवला धुरळा

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ही युती होणार असल्याचं रोज ठामपणे सांगत आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं कौतुकही सुरू आहे. काल उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यासोबत युती होण्याच्या चर्चेवर सूचक विधान करून धुरळा उडवून दिला.

जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे मोजून दोन वाक्य बोलले होते. पण दैनिक सामनाने तीच मुख्य बातमी केली. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटोही छापला. गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांचा दैनिक सामनात पहिल्या पानावर राज ठाकरे यांचा फोटो छापल्याने पुन्हा एकदा या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपासून मनसे आणि ठाकरे गटाचे नेते या युतीवर प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनीही आज घराबाहेर पडताना पत्रकारांना मातोश्रीवर जातोय सांगून त्यांची फिरकी घेतली.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.