Rajesh Tope Exclusive | 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का? आरोग्य मंत्री म्हणतात…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Health Minister Rajesh Tope on Lockdown).

Rajesh Tope Exclusive | 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का? आरोग्य मंत्री म्हणतात...

मुंबई : “14 एप्रिलला लॉकडाऊन मागे घ्यायचा की नाही हा केंद्राचा निर्णय आहे (Health Minister Rajesh Tope on Lockdown). जर मागे घेतला तर सर्वजण घराबाहेर पडतील आणि 21 दिवसांच्या लॉकडाऊनवर पाणी फिरेल. आपण 14 तारखेपर्यंत वाट बघू, स्वत:ला शिस्त लावू, लॉकडाऊन संपवायचा असेल तर आपण खबरदारी घेण्याची गरज आहे”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Health Minister Rajesh Tope on Lockdown).

“लॉकडाऊनबाबत 14 एप्रिलला पंतप्रधान जाहीर करतील. 14 एप्रिल नंतर परिस्थिती नॉरमल होईल असं समजू नका. लोकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांची मतं घेऊनच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. अजून 15 दिवस आहेत. आताच लॉकडाऊन वाढेल की नाही सांगता येणार नाही. काही राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन 50 ते 60 दिवसांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थ आपल्या देशात तो वाढणार असं मी म्हणणार नाही, तो मला अधिकारही नाही”, असं राजेश टोपे म्हणाले.

हेही वाचा : Corona LIVE | राज्यात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या 400 पार

“सध्या आपण शंभर टक्के दुसऱ्याच स्टेजला आहोत. जर समूह संसर्ग असेल तरच तिसरी स्टेज म्हणता येते. समजा धारावीतील 100 जणांना तपासल्यावर 70 पॉझिटिव्ह निघाले तर त्याला तिसरी स्टेज म्हणता येईल. आपण दुसऱ्या स्टेजला आहोत, अन्य देशात समूह संसर्ग झाल्याने तिकडे वेगाने आकडे वाढले”, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

“गर्दी टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. गर्दी टाळण्यासाठी दुकाने 24 तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही गर्दी होतेय हे चुकीचं आहे”, असं आरोग्यमंत्री म्हणाले.

“कोरोना रोखण्यासाठी आपण योग्य ती पावलं टाकली आहेत. पाश्चिमात्य देशात लागण होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली. आपल्याकडेही संख्या वाढतेय, पण डिस्चार्जच प्रमाणही आपल्याकडे जास्त आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

“महाराष्ट्रात 338 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्यानंतर रॅपिड टेस्टला मंजुरी मिळाली. या टेस्टमुळे 5 मिनिटात आपल्याला संसर्ग झाला की नाही हे समजेल. रॅपिड टेस्टमुळे ट्रेसिंग करणं सोपं जाईल, संसर्ग टाळण्यासाठी ते उपयोगी आहे. रॅपिड टेस्टमुळे तीन ते पाच मिनिटात आपल्याला लागण झाली की नाही समजेल, शासनमान्य संस्थांमार्फतही अशा चाचण्या करण्याचा प्रयत्न आहे”, असं आरोग्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : श्रीमंत गेले फार्महाऊसवर, पण गरिबांच्या घरात बसायला जागा नाही, त्यामुळे ते रस्त्यावर : आव्हाड

“अनेक ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे. मुंबईसाठी विशेष व्यवस्था केली आहे. रिकाम्या इमारती, मोकळी मैदानंही पाहिली आहेत. सर्व तयारी केली आहे, पण त्या स्टेजला जाऊ नये यासाठी प्रयत्न आहेत”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“खासगी डॉक्टर आणि छोट्या क्लिनिकला विनंती, तुमचे क्लिनिक बंद करु नका. तुम्हाला N 95 मास्क पुरवू, हवे ते देऊ, भले तुम्हाला एखादा रुग्ण कोरोना संशयित वाटला तर त्याला तपासू नका, पण अन्य रुग्ण तरी तपासा. अपघातात हात-पाय तुटलेला रुग्ण, लहान मुलं, गरोदर महिला, डायबेटिज पेशंट अशा अनेक रुग्णांवर उपचार आवश्यक, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवू नये”, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.

संबंधित बातम्या :

निजामुद्दीनच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 1400 लोक सहभागी, आरोग्यमंत्र्यांची माहिती

लॉकडाऊनची 21 दिवसांची मुदत वाढणार नाही, मोदींसोबत बैठकीनंतर अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा दावा, तासाभरात ट्वीट डिलीट

Published On - 6:33 pm, Thu, 2 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI