मुंबईकरांसमोर नवे संकट, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अतिधोक्याच्या व्यक्तींमध्ये वाढ

मुंबईकरांसमोर नवे संकट, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अतिधोक्याच्या व्यक्तींमध्ये वाढ

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे (High risk persons increases in Mumbai).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 30, 2020 | 1:08 PM

मुंबई : महापालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीत वाढ झाली आहे. असं असली तरी मुंबईकरांसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे (High risk persons increases in Mumbai). त्यामुळे काहिशी काळजी व्यक्त केली जात आहे.

सध्या मुंबईत सरासरी हजार ते बाराशे कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, या रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 5 हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत. मुंबईत सातत्याने होत असलेले कोरोना नियंत्रणाचे प्रयत्न आणि जनजगृतीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा दररोज वाढत आहे. ही चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

मागील 24 तासांमध्ये बाधित रुग्णांच्या संपर्कात तब्बल 5 लाख 42 हजार 942 व्यक्ती आल्या आहेत. या व्यक्तींचा समावेश अतिजोखमीच्या संपर्कातील व्यक्तींच्या यादीत करण्यात आला आहे. त्यातील 2 हजार 211 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले. 2 हजार 718 व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटर एकमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईतील बाधित रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज साधारणत: 5 हजारांहून अधिक व्यक्तींचा समावेश अतिजोखमीचे संपर्क म्हणून केला जातोय.

गेल्या आठवड्याभरात 40 हजार 295 बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अतिजोखमीचे संपर्क ठरले आहेत. त्यातील 21 हजार 438व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटर एकमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईतील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेडून ‘चेस दी व्हायरस’ मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

पतीचं कोरोनाने निधन, कुटुंबही बाधित, औरंगाबादमध्ये वयोवृद्ध आजीला झाडाखाली ऑक्सिजन

Tukaram Mundhe Corona | ‘ऑल इज वेल’, तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट

औरंगाबादमध्ये विनामास्क मॉर्निंग वॉकसाठी तोबा गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून समज

High risk persons increases in Mumbai

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें