भाजप नेता म्हणतो, मुंबईत ऑटो, टॅक्सीचं भाडं वाढवा, नाही तर मातोश्रीसमोर चक्का जाम

तीन चाकी सरकारला तीन चाकी ऑटोचा विसर पडला आहे. राज्य सरकार रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर गुंडगिरी करत आहे. | Auto Rickshaw and Taxi

भाजप नेता म्हणतो, मुंबईत ऑटो, टॅक्सीचं भाडं वाढवा, नाही तर मातोश्रीसमोर चक्का जाम
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 1:57 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून शिवसेनेची (Shivsena) सातत्याने कोंडी करणाऱ्या भाजपने आता मुंबईत आणखी एका आंदोलनाची हाक दिली आहे. भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे (Taxi fare) वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. अन्यथा 25 डिसेंबरला मातोश्रीसमोर चक्का जाम आंदोलन करु, असा इशारा शेख यांनी दिला आहे. (BJP Demands hike in Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai)

हाजी अराफत शेख यांनी शनिवारी मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीची मागणी केली. तीन चाकी सरकारला तीन चाकी ऑटोचा विसर पडला आहे. राज्य सरकार रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर गुंडगिरी करत आहे. राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात दोन ते तीन रुपयांची वाढ करावी. अन्यथा 25 डिसेंबरला मातोश्रीवर रिक्षा आणि टॅक्सी नेऊन चक्का जाम करु, असे हाजी अराफत शेखर यांनी सांगितले.

राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आतापर्यंत कोरोना काळातील उपाययोजनांची अंमलबाजवणी, वीज बिल, मेट्रो कारशेड आणि मंदिरे उघडण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेत भाजपने शिवसेनेला जेरीस आणले आहे. त्यामुळे आता शिवसेना आपल्या वाहतूक संघटना आणि नेत्यांच्या माध्यमातून राज्य सरकार टॅक्सी आणि रिक्षा चालकांशी संवाद साधणार का, हे पाहावे लागेल.

शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, एकहाती निर्णय घेते; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका

राज्यात महाविकासआघाडी असली तरी सध्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (Shivsena) दिलेला कोणताही शब्द पाळत नाही. काँग्रेसला कोणत्याही निर्णयात सामील करुन घेतले जात नाही. शिवसेनेकडून सर्व निर्णय एकहातीच घेतले जातात, असा आरोप पालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावरच लढवावी, असे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे रवी राजा यांनी सांगितले. यावर आता शिवसेनेचे नगरसेवक यावर काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?

मुंबईकरांवर पाणीसंकट! एन आणि एल विभागात दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णतः बंद

ठाकरे सरकारला विकासाचं कावीळ, शेलारांची टीका सेनेच्या जिव्हारी

(BJP Demands hike in Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.